loader
Breaking News
Breaking News
Foto

संतोष वारे पुन्हा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष! मांढरे यांना डच्चु तर आमदार शिंदे यांना देखील धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस चे विद्यमान तालुकाध्यक्ष हणुमंत मांढरे पाटील यांना पुन्हा एकदा पक्षाने डच्चू दिला आहे. बागल गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले वारे यांना राष्ट्रवादी ने थेट तालुकाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली होती .या संधीचे सोने करून वारे यांनी कोविड कालावधीत जबरदस्त काम करीत पक्षवाढीसाठी योगदान दिले होते. मात्र अचानक जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी वारे यांना हटवून पुन्हा एकदा हणुमंत मांढरे पाटील यांना तालुकाध्यक्ष पदावर संधी दिली होती.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मात्रार दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीने अचानक पदावरून काढल्यानंतर वारे यांनी कोणतीही आदळापट न करता पक्षाचा आदेश मानुन काम सुरु ठेवले मात्र दुसरीकडे आपल्या समर्थकांकडून चुकिची निवड झाली असल्याचे मेसेज वरिष्ठांपर्यंत पोहचवले होते.अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतोष वारे यांना पुन्हा एकदा संधी देऊन मांढरे पाटील यांना धक्का दिला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

संतोष वारे हे प्रमाणीक पणे राष्ट्रावादी चे काम करत असल्याने जिल्हापरिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत अडसर ठरू शकतील अशी शंका असल्याने आमदार संजयमामा शिंदे यांनी वारे यांना हटवण्यासाठी छुपे प्रयत्न केले होते अशी चर्चा होती मात्र पुन्हा एकदा संतोष वारे यांची राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदावर संधी दिल्याने आमदार संजयमामा शिंदे यांना देखील पक्षाने सुचक इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दोन अडीच महिन्यापूर्वी निवड झाल्यानंतर नव्या जोमाने कामाला लागलेले तालुकाध्यक्ष हणुमंत मांढरे पाटील हे आत्ता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्णयावर काय भुमिका घेतात या कडे राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts