loader
Breaking News
Breaking News
Foto

खालील शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात करमाळा तालुक्यातील सायन्स वाॅल चे सादरीकरण, मान्यवरांकडून कौतुक

बारामती येथे टाटा ट्रस्ट, नेहरू सेंटर आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने Science & Innovation Activity Center च्या इमारतीचे उदघाटन प्रसंगी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते( 16 आणि 17 जून 2022)या प्रदर्शनात गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनातुन साकरलेल्या करमाळा तालुक्यातील सायन्स वॉल प्रोजेक्ट साठी स्टॉल देण्यात आलेला होता. यामध्ये करमाळ्यातील सायन्स वॉल या कौतुकास्पद उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री मा खा शरद पवार, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर , सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , संसदरत्न पुरस्कार विजेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, रोहित पवार, युवा शास्त्रज्ञ गोपालजी यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये शारदानगर बारामती येथे या सायन्स सेंटरचे आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विज्ञानाविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता आणण्यासाठी तसेच त्यांना संशोधनाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी, नवसंकल्पना जागृत करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या सायन्स सेंटरचे आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करत असल्याचे मनोगत यावेळी पवार साहेबांनी व्यक्त केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

विज्ञान विषयक जागृतता निर्माण करण्याच्या याच उद्देशाने करमाळा तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या सायन्स वॉल या कौतुकास्पद उपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनिता बारवकर (कोंढारचिंचोली) राजू भोंग (देलवडी),.महादेव भारती (नरसोबावाडी), बाळासाहेब बोडखे (खातगाव नं.2) या शिक्षकांनी सादरीकरण केले. तसेच रोहन दत्तात्रय चाकणे, वैष्णवी मधुकर टकले (देलवडी), आर्यन लांडगे ,भक्ती गलांडे (कोंढारचिंचोली), स्वराज बोडखे (खातगाव नं.2 ), या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे मुखवटे परिधान करून उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत या महान शास्त्रज्ञांच्या कार्याचा जीवनपटच सादर केला. सायन्स वॉलमुळे शाळाशाळांमधून आणि गावागावातील आबालवृद्धांमधून कसा बदल होत गेला याचे अनुभवासहित सादरीकरण या शिक्षकांनी केले. तसेच महादेव भारती यांनी शास्त्रज्ञांच्या कार्याची माहिती क्यू आर कोड द्वारे सर्वांसाठी उपलब्ध करून दिली. यावेळी करमाळा तालुक्यातील विविध शाळांमध्ये जयंती साजरी केल्यानंतर त्याची नोंद करून ठेवलेले अहवाल, उपक्रमाचे फोटो उपस्थितांना दाखविले. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शना दरम्यान हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांनी या स्टॉलला भेटी दिल्या आणि या उपक्रमाची यशस्विता ऐकून करमाळा तालुक्यातील सर्व शिक्षकांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

जि प शाळा कोंढारचिंचोली येथील पृथ्वी मिसाईल चे prototype राजीव गांधी सायन्स सेंटर समोर उभारण्यात आले आहे.यामुळे कोंढारचिंचोली शाळेस अत्यंत उच्च असा बहुमान मिळाला आहे.करमाळा तालुक्यातील स्टॉल वर उभा केलेल्या सेल्फी पॉईंट ने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि हजारो लोकांनी स्टॉल समोर सेल्फी काढले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts