loader
Breaking News
Breaking News
Foto

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी माजी आमदार नारायण पाटील यांचा पुढाकार, तहसीलदार यांना भेटुन देणार निवेदन

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत आपण सोमवारी तहसिलदार यांना निवेदन सादर करणार असल्याची माहिती माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

राज्यात सध्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत युध्दपातळीवर शासकीय स्तरावर प्रयत्न चालू असताना करमाळा विधानसभा मतदार संघातील इतर मागास प्रवर्गासाठी राजकीय आरक्षण मिळावे यासाठी पाटील गटानेही आग्रही भूमिका घेतली आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी आमदार नारायण पाटील यांनी म्हटले आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाने ओबीसी समाज हा राजकीय प्रवाहातून बाहेर फेकला जाण्याची शक्यता निर्माण झाली असून ओबीसींना हक्काचे राजकीय आरक्षण मिळावे ही आपली ठाम भूमिका आहे. सध्या राज्यातील इतर ठिकाणा प्रमाणेच करमाळा विधानसभा मतदारसंघात सुध्दा इंपिरियल डाटा यासाठी पुरक ठरणारा ओबीसी जनगणना अहवाल तयार करण्याचे काम शासकीय स्तरावरुन प्रत्येक गावी चालू आहे. अनेक गावामधील ओबीसी प्रवर्गातील लोकसंख्येच्या आकडेवारीचे संकलन केले गेले आहे परंतू यात काही त्रुटी आम्हाला आढळून आल्याने सोमवारी आम्ही प्रत्यक्ष माननीय तहसिलदार तथा तालूका निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटुन एक निवेदन सादर करणार आहोत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या निवेदनात आमच्या काही मागणी वजा सुचनांचा समावेश असून सदर निवेदनातील बाबी मा तहसिलदार यांना भेटुन सांगण्यात येतील व यावर चर्चाही केली जाणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर सोमवार दि 20 जून रोजीच्या या नियोजीत भेटीबाबत पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी माहिती देताना सांगितले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक शिष्टमंडळ माननीय तहसिलदार यांना निवेदन सादर करणार असून या शिष्टमंडळात करमाळा मतदार संघातील ओबीसी समाजातील आजी माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी ठिक 1 वाजता करमाळा येथील श्री दत्त मंदिरासमोर सर्व निमंत्रितांनी एकत्र येऊन येथून करमाळा तहसिल कार्यालयाकडे जाण्याचे नियोजन आहे. माननिय तहसिलदार यांना भेटण्यापुर्वी श्री दत्त मंदिरात सर्वासमक्ष निवेदनाचे वाचन होणार असून यातील सुचनांवर विचार विनीमय होणार आहे.या शिष्टमंडळात ओबीसी प्रवर्गात मोडल्या जाणाऱ्या सर्व जातीचे प्रतिनीधी असणार आहेत.तरी सोमवारी ओबीसी समाजातील राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक, सहकार, क्रिडा, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापार व उद्योग तसेच महिला व युवक आदि क्षेत्रातील जाणकार नागरिकांनींही सहभागी होऊन या निवेदनास जनमान्यता द्यावी असे आवाहनही यावेळी पाटील गटाकडून करण्यात आले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts