शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तळागाळातील रुग्णांसाठी मदतीचा आधार केंद्र ठरत असून आरोग्याच्या संदर्भात मदत मिळवण्यासाठी वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले.शिवसेनेचे युवा नेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना महिला आघाडी व शिवसेनेच्या वतीने करमाळा येथे जयवंतराव जगताप सभागृहामध्ये शिबिराचे आयोजन केले होते यावेळी चिवटे बोलत होते.
या शिबिरात जवळपास पाचशे रुग्णांची ईसीजी सह ब्लडप्रेशर सर्व आरोग्याच्या तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली .शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांची यादी करून त्यांच्यावर ठाणे येथील गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून देण्यात येणार आहेत तसेच बायपास शस्त्रक्रिया खंडाळा येथील मानसी हॉस्पिटलमध्ये मोफत करून देण्यात येणार आहे .
या शिबिरासाठी वैद्यकीय मदत कक्षाचे माढा लोकसभा प्रमुख आदिराज कोठडिया डॉक्टर अमोल मोटे, डॉक्टर लोकरे ,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियांकाताई गायकवाड माजी शहरप्रमुख संजय शीलवंत उपशहरप्रमुख संतोष गांगुर्डे ,युवा नेते राहुल कानगुडे, दादा तनपुरे ,पत्रकार नासीर कबीर ,अशोक नरसाळे, विशाल घोलप, अविनाश जोशी ,सिद्धार्थ वाघमारे ,युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड ,सागर गायकवाड ,लक्ष्मण भोसले ,अण्णा सुपनर ,आदिनाथ इरकर ,आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होतेमानसी हॉस्पिटल खंडाळा यांच्या डॉक्टर चमूने रुग्णांची तपासणी केली.यावेळी प्रत्येक रुग्णाला एक महिन्याची औषधे मोफत देण्यात आली
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.