ब्रिटीश अधिकारी ज्याप्रमाणे अंगावरील कोट दररोज बदलतात त्याप्रमाणे काही मंडळी गट बदलला की आपली भुमिका बदलतात, असा मार्मिक हल्लाबोल आज पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी अॅड. अजित विघ्ने यांच्यावर नाव न घेता केला. उजनी पाणी परिषदेची सांगता सभा झाल्यानंतर आज वर्तमानपत्रात आलेल्या बातमीमध्ये आमदार शिंदे गटाकडून प्रथमच एक प्रतिक्रिया दिली गेली असून त्यात लाकडी-निंबोडी योजना ही जुनीच असून पाटील गटाच्या पाणी परिषदेचा केवळ राजकीय हेतू होता असे विघ्ने यांनी म्हटले आहे. या प्रतिक्रियेला उत्तर देताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आमदार शिंदे यांच्या भुमिकेबाबत प्रश्न उभे केले.
यावेळी ते म्हणाले की मागील वर्षी इंदापुरच्या या योजनेस मंजूरी मिळाल्याचे वृत्त समजताच त्यावेळी आमचेसमवेत असलेल्या काही मंडळींनी जेऊर ता. करमाळा येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित केली.या बैठकीतच इंदापुरच्या या योजनेवर आजमितीस शिंदे गटाची वकीली करणार्या या महाशयांनी लांब लचक भाषणही केले व हि योजना कशी अन्यायकारक आहे हे पटवून सांगितले. याच बैठकीत या योजनेच्या आदेशाची होळी करण्याचा निर्णय सुध्दा घेतला गेला. मग याची अंमलबजावणी तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच केतूर गावातही झाली व याच महाशयांनी या आदेशाची बोटाला चटके बसे पर्यंत होळी केली. मग आज तोच सवाल आम्ही विद्यमान आमदार यांना विचारतोय की तुम्ही रद्द केलेला आदेश कोणत्या योजनेचा होता. यावर आमदार महोदय मौन बाळगून आहेत पण या महाशयांना मात्र आमची उजनी परिषद खुपच झोंबलेली दिसून येतेय. हि उजनी परिषद केवळ लाकडी-निंबोडी या योजनेवर नव्हती तर यात गाळमुक्त उजनी, प्रदूषणमुक्त उजनी, लवादाच्या निर्णयानुसार पाणी वाटप, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प, पुनर्वसन नागरिकांना अठरा नागरी सुविधा, उजनी पर्यटन विकास आदि अनेक विषयांवर विचार मांडले गेले. आणि या गोष्टीसाठी जो काही अभ्यास असतो तो आम्ही सर्वांनी जरुर केला होता. तुम्ही जर या विषयात पारंगत असाल तर तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे. तुम्ही आमदार महोदयांना या विषयी बोलण्यास भाग पाडा. उगीच आमच्या उजनी परिषदेचे मोजमाप करुन नेत्यांची मर्जी सांभाळण्याचे काम करु नका असे देखील तळेकर यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना तळेकर म्हणाले की करमाळा तालूक्यात अॅड स्व.देवकर, श्री सुखलाल लुणावत, अॅड. कमलाकर वीर, अॅड.जरांडे,अॅड रोकडे, अॅड. बाबुराव हिरडे आदिं सह सर्वच नामांकित वकीलांनी समाजकारण व राजकारण करत असताना नेहमीच जनतेची बाजू मांडण्याचे काम केले आहे. भले ही सर्व मंडळी वेगवेगळ्या गटासाठी काम करत असोत. पण या सर्वांनी जनतेचे हित पाहिले. आज आमदार शिंदे गटाकडे जनतेच्या व शेतकऱ्यांच्या विरोधात भुमिका घेऊन आमदार महोदयांची बाजू मांडणारे हे वकील महाशय आहेत याचा शिंदे गटालाही सार्थ अभिमान वाटत असावा, असा मार्मिक टोला प्रवक्ते सुनील तळेकर यांनी लगावला. उजनी परिषदेच्या माध्यमातून आम्ही सभा व त्याचे फेसबुकवरुन थेट प्रक्षेपण, व्हाटस् अप आणि इन्सटाग्राम आदि सोशल मेडीयांचा वापर करुन व वर्तमानपत्र आणि न्युज पोर्टलवर आलेल्या बातम्यांद्वारे प्रत्यक्षात एक लाख नागरिकांपर्यंत पोहचलो असल्याचा दावा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.