उजनी मधून पाणी उचलण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाकडी निंबोडी योजना मंजूर केली होती यास सांडपाणी उचलण्याचे गोंडस नाव पुढे केले होते . पवार कुटुंबीयांनी सुप्रीया सुळे यांचा लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यासाठी हि योजना भरणे यांच्या माध्यमातून पुढे रेटली होती . या योजनेस सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व विविध संघटनानी विरोध केला .जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे यांनी यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता. माजी आमदार नारायण पाटील यांनी देखील या योजनेस विरोध केला होता .त्यावेळेस आमदार संजय मामा शिंदे यांनी मंत्रालयात जाऊन जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते लाकडी निंबोडी योजना रद्द केल्याचे पत्र घेऊन बाजी पलटवली होती व त्याची जोरदार प्रसिद्धी केली होती.मात्र राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा हि योजना मंजूर करून पाणी पळवण्याचा घाट घातला गेला आहे. एककीडे तिव्र विरोध होत असताना योजनेस प्रशासकीय पातळीवर देखील गती मिळत आहे.
लाकडी निंबोडी योजना रद्द करण्याचे आदेश दाखवून पेपरबाजी करणारे आमदार संजय मामा शिंदे यांची मात्र या प्रकरणा वरून मोठी गोची झाल्याचे पहावयास मिळत असुन नेमकी हिच नस धरून लाकडी निंबोडी योजने वरुन आमदार संजयमामा शिंदे यांना घेरण्यास पाटील गटाकडून सुरवात झाली आहे. उजनी पाणी परिषदेचे आयोजन करून पश्चिम भागात सभाचां धडाका लावला असून योजना रद्द झाल्याची घोषणा करणारे आमदार "संजयमामा शिंदे हे उजनीचे पाणी पळवले जात असताने गप्प का ?" असा सवाल विचारला जात आहे. उजनी पाणी परिषेदेचा पहिला टप्पा संपत आला असून जवळपास सात सभा पार पडल्या आहेत. वाशींबे, उमरड, चिखलठाण ,वांगी, कंदर, टाकळी या गावातील सभांना उजनीग्रस्तांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.
पाच जुन रोजी शेलगाव येथे शेवटची सभा होणार असून सभेद्वारे प्रत्येक ठिकाणी पुजन करण्यात आलेल्या उजनी कलशा मध्ये कृष्णा नदिचे पाणी देखील आणले जाणार असुन शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कृष्णा व भिमेच्या पाण्याचा एकत्रित जलधारा अभिषेक श्री शिंगणापूर येथील शंभु महादेवास करण्यात येणार आहे. या कलशाचे पुजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील भाजपाचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार असून जलधारा अभिषेकास माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील पाटील देखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.