करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार सुरु असुन जेऊर ते कोंढेज या प्रमुख मार्गावरील पुलाची दुरुस्ती करण्यासाठी भर पावसाळ्याच्या तोंडावर सुरवात केली आहे .त्यातच दहिगाव च्या पाणी पुर्ण वेगाने आल्याने कोंढेज सह वरकटणे, सौंदे ,शेलगाव भागातील लोंकाचा जेऊर चा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. जेऊर हे मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे ,रेल्वेस्थानक आहे. अनेक हाॅस्पिटल आहेत त्यामुळे जेऊर ला येणाऱ्या नागरींकाची संख्या मोठी असून त्यांची बांधकाम विभागाच्या व दहिगाव योजनेच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षांपासून या पुलासाठी निधी मंजूर असताना ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून का पाठिशी घालण्यात आले या विषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. बांधकाम विभाग दोन वर्ष झोपा काढत होते का? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरींकातुन उमटत आहेत.
दोन वर्षांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसात या पुलाच्या वरच्या बाजुला असलेल्या जेऊर लव्हे पुलावरून चारचाकी वाहुन तिन जणांचे प्राण गेले होते .व या जेऊर- कोंढेज पुलांचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य शासनाकडुन अतिवृष्टीत नुकसान झालेले रस्ते पुल दुरुस्ती साठी मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध झाला होता त्यानुसार लव्हे पुलाच्या दुरुस्तीसाठी सात लाख तर कोंढेज मार्गावरील पुलासाठी ३५ लाख मंजूर झाले होते.लव्हे पुलावर तात्पुरती मलमपट्टी करुन बिलं उखळण्याचे काम झाले असून कोंढेज मार्गावरील पुल निधी उपलब्ध असुन देखील रेंगाळला होता.
युवा सेनेने उठवला होता आवाज गंभीर अपघात झालेला असताना व निधी उपलब्ध असताना देखील पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष का? या विषयी युवासेना समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी आवाज उठवला होता. त्यावेळेस तात्काळ काम सुरु करण्याचे करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री उबाळे यांनी कबूल केले होते मात्र पुर्ण उन्हाळा संपला तरी या पुलाचे काम सुरु झाले नव्हते. मागच्या चार ते पाच दिवसांत हे काम सुरु असुन पावसाळ्या पुर्वी काम पुर्ण करण्यासाठी घाईगडबडीत काम उरकले जात असल्याचे कामाच्या दर्जावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. हे काम सुरु असतानाच काल अचानक दहिगाव योजनेचे पाणी मोठ्याप्रमाणात या ओढ्याला आल्याने परवाच झालेले फाऊंडेशन त्यावरचे सिमेंट काँक्रिट वाहुन गेले असल्याची शक्यता आहे. पुलाचे काम सुरु असल्याने दहिगाव योजनेचे पाणी सोडु नका असे पत्र बांधकाम विभागाकडून संबंधित विभागाला दिले होते का? दिले असेल तर दहिगाव योजनेच्या अधिकाऱ्याकडून दखल का घेतली गेली नाही याची चौकशी केली जावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.