loader
Breaking News
Breaking News
Foto

उच्च शिक्षण अभ्यास क्रम २५ टक्के कमी करा संध्याताई सोनवणे यांची उच्च शिक्षण मंत्र्याकडे मागणी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्षावर खुपच परिणाम झाला आहे. शिक्षण विभागाने १ली ते १० वी चा अभ्यासक्रम २५ टक्के कमी केला आहे. याच धर्तीवर उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम देखील २५टक्के कमी करावा अशी म्हत्वपुर्ण मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस च्या पुणे विभाग अध्यक्षा संध्याताई सोनवणे यांनी उच्च तंत्रज्ञान व शिक्षण मंत्री प्रजक्त तनपुरे यांना प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोना संकटामुळे महाविद्यलये बंद आहेत ते कधी सुरु होतील या बाबत देखील कोणतीही स्पष्टता नाही . ऑनलाइन वर्ग सुरु असले तरी ग्रामीण भागात नेटवर्क, व विजेचा प्रश्न निर्माण होत असल्याने अभ्यासात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.

चौफेर प्रतिनिधी / नगर

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पुर्ण करणे शक्य होणार नाही व तरिही परिक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांवर ताण येईल व गुणवत्ते वर विपरित परिणाम होतील त्या मुळे उच्च शिक्षण अभ्यास क्रम २५टक्के कमी करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. या वेळी नगर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts