उजनी प्रदुषणमुक्त व्हावी यासाठी पर्यटन तथा पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना साकडे घालणार अशी ग्वाही माजी शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांनी उजनी पाणी परिषदेच्या नियोजित कार्यक्रमात दिली. उजनीतुन लाकडी निंबोडी योजनेद्वारे पाणी उचलण्याचा राष्ट्रवादीने डाव आखला असून तो हाणून पाडण्यासाठी शिवसेना माजी आमदार नारायण पाटील मैदानात उतरले असून पाणी परिषद सभेद्वारे ते रान पेठवत आहेत. नुकतीच कंदर येथे उजनी परिषदेची तिसरी सभा पार पडली या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या उजनी कलशाचे पुजन लक्ष्मण मंगवडे, रामभाऊ कदम, रावसाहेब जाधव, श्रीहरी कदम या शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मा आ पाटील म्हणाले की पुणे, पिंपरी-चिंचवड भागातून भीमा नदीपात्रात घाण पाणी, कचरा सोडला जातो. विविध औद्योगिक कारखान्यांकडूनही विषारी व आरोग्यासाठी हानिकारक असलेले टाकाऊ रसायन मिश्रीत भीमा पात्रात सोडले जाते. याचा शेवट उजनी बॅकवॉटर परिसरातील भागात येऊन ठेपतो. आज बॅकवॉटर परिसरातील अनेक गावे हे पाणी पिण्यासाठी म्हणून वारतात. एवढच नव्हे तर सोलापूर सह इतर जिल्ह्यात हे पाणी पिण्यासाठी म्हणून उचलले जाते. या पाण्याचा परिणाम केवळ मनुष्याच्या आरोग्यावर होत नाही तर उजनी परिसरातील जमीनही आता नापाक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. देश परदेशातील विविध पाणी संघटना व जलतज्ञांनी उजनीचे पाणी पिण्यास लायक नसल्याचे संशोधन करुन जाहिर करुन टाकले आहे.मी स्वतः आमदार असताना सन २०१४-१९ दरम्यान हा प्रश्न अधिवेशनात मांडला. तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी माझ्या या प्रश्नाचे लेखी उत्तर देऊन संबंधीत महापालिकांना तात्काळ यावर उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या परंतु आजही हा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून किडणी, ह्रदय, मुत्राशय, मुळव्याध, पोटाचे विकार तथा कॅन्सर पर्यंत रोग या दुषीत पाण्यामुळे उजनी बॅकवॉटर परिसरातील नागरिकांना झाले आहेत.
जमिनींचा पोत उतरला आहे.आणि म्हणूनच आता उजनीच्या पाण्यासह उजनी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून आपण जन आंदोलन उभा करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.या पाणी परिषदेत यावेळी शिवशंकर माने, श्रीहरी कदम,महेंद्र पाटील, राजाभाऊ कदम, दत्ता सरडे, गहिनीनाथ ननवरे, सभापती पै अतूल पाटील, जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी विचार मांडले. सुत्रसंचलन अजित वगरे यांनी केले तर आभार गोपाळदादा मंगवडे यांनी मानले. या परिषदेस जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सभापती अतूल पाटील, अजितदादा तळेकर, माजी सभापती शेखर गाडे, माजी संचालक धूळाभाऊ कोकरे,नवनाथ शिंदे, मा जि प सदस्य चंद्रप्रकाश दराडे, जि प सदस्य बिभीषण आवटे, मा उपसभापती दत्ता सरडे, बहूजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम,महेंद्र पाटील, गोपाळ मंगवडे,मौलासो मुलाणी, इंद्रजित कदम, बाळासो मंगवडे, अकलाख जहागिरदार,विजय नवले, पिंटू भगत, बंडू माने, बंडू पवार, संतोष शिंदे, नारायण यादव, सुहास कदम, दिलावर शेख, भैय्या मंगवडे, देविदास शिंदे,कैलास माने, पांडुरंग तळे, नितीन हिवरे, दादासाहेब पाटील, नामदेव काळे, सुरेश धडस, महादेव धडस, अजिनाथ बनसोडे, अमर ठोंबरे, सःजय कदम, गणेश काळे, महावीर जगताप, मोहन धडस, चंद्रसेन पालवे, धनू घोरपडे आदि मान्यवर उपस्थित होते
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.