loader
Breaking News
Breaking News
Foto

फिसरे येथील सुपुत्र पोलीस हवलदार निखील साबळे यांचा मुंबई येथे संशयास्पद मृत्यू!

फिसरे ता करमाळा येथील सुपुत्र व मुंबई येथे पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेले निखिल गौतम साबळे (वय 23) यांचा मुंबई येथील कांजूरमार्ग पोलीस स्टेशन हद्दीत कर्वेनगर इमारत क्र. पी/1मजला 8फ्लॅट येथे संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मृत्यु चे कारण स्पष्ट झालेले नाही. निखिल साबळे हे दोन वर्षापुर्वी मुंबई पोलीस मध्ये जाॅईन झाले होते.निखिल यांचे अजून लग्न देखील झाले नव्हते. तरुण व कमावत्या वयात मृत्यु झाल्याने कुटुबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.आज संध्याकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव फिसरे या गावी पोहचणार असून त्यानंतर अंत्यविधी होणार आहे. मुंबई पोलीस व रुग्णालयाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होवु शकते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

निखिल साबळे यांच्या निधनाची बातमी समजातच फिसरे गावावर दुखाचा डोंगर कोसळला असून निखिल यांच्या मित्रांकडून सोशल मीडियावर श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे.निखिल साबळे यांच्या पश्चात आई वडील भाऊ भावजय असा परिवार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts