उजनी पाणी परिषदेच्या दहा सभांमधील सहभागी गावांची नावे जाहीर झाली असून आज वांगी क्रमांक ३ येथे होणार्या सभेत सहा गावांचा समावेश असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली आहे.
माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणग्रस्तांचे प्रश्न व समस्या जाणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी आजपासून "उजनी पाणी परिषदेचे" आयोजन करण्यात आले असून याबाबत अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की उजनी धरणासाठी त्याग केलेल्या प्रत्येक धरणग्रस्ताशी संवाद साधण्याचा या परिषदेचा उद्देश असुन सभेचे ठिकाण व त्यामध्ये समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे असतील.वांगी नं ३ येथील सभेत वांगी ३ सह वांगी नं १, वांगी नं ४,भीवरवाडी, बिटरगाव (वां) व ढोकरी या गावांचा समावेश आहे. तर उमरड येथील सभेत पोफळज, सोगाव पुर्व, रिटेवाडी व मांजरगाव येथील धरणग्रस्त सहभागी होतील. कंदर येथील सभेत सांगवी, बिटरगाव (सां), कविटगाव तसेच उजनीच्या पाण्यावर आधारित वडशिवणे व सातोलीच्या काही भागातील शेतकरी सहभागी होतील
चिखलठाण नं १ येथे होणार्या सभेत चिखलठाण नं २,कुगाव, केडगाव व शेटफळ (ना) या गावांचा समावेश आहे. तर शेलगाव (वां) येथील सभेसाठी वांगी नं २,दहिगाव, भाळवणी व पांगरे येथील शेतकरी सहभागी होतील. वाशिंबे येथील सभेत उंदरगाव, सोगाव पश्चिम व गोयेगाव मधून धरणग्रस्त येतील. तर केतूर नंबर २ येथील सभेत केतूर नं १,पोमलवाडी, पारेवाडी व हिंगणी गावांचा समावेश आहे.टाकळी येथे होणार्या सभेत खातगाव क्र १,२ व ३ चे धरणग्रस्त सहभागी होतील.कोंढारचिंचोली येथील सभेत कात्रज येथील धरणग्रस्त सहभागी होणार आहेत. तसेच जिंती येथील सभेत कावळवाडी, रामवाडी, भिलारवाडी, भगतवाडी, व गुलमोहरवाडी येथील धरणग्रस्त सहभागी होतील.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.