loader
Breaking News
Breaking News
Foto

हाॅटेल शिवम प्राईडचे दिमाखदार उद्घाटन!

नगर टेंभुर्णी रोडवरील शेलगाव वांगी येथे आदिनाथ कारखान्या लगत नव्याने झालेल्या हाॅटेल शिवम प्राईड चे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन पार पडले.या वेळी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण आबा पाटील ,मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे,पुणे जिल्हा बँक चे संचालक आप्पासाहेब जगदाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत शिवम प्राईड हाॅटेलचे मालक शिवम घोगरे यांनी केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शिवम प्राईड हे शुद्ध शाकाहारी हाॅटेल असून फॅमीलीची स्वतंत्र बैठक व्यवस्था, मिटींग हाॅल, तसेच एसी नाॅन एसी लाॅजींग ची सोय उपलब्ध आहे.तसेच चायनीज, साऊथ इंडीयन थाळी, ज्युस, तसेच विविध स्पेशल व्हेज डिशेस उपलब्ध आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

शेलगाव वांगी येथील अरविंद (दाजी) घोगरे यांनी हे भव्य हाॅटेल उभा केले होते. मात्र मध्यंतरी कोरोना मध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र शिवम (आबा) घोगरे यांनी हाॅटेलचे पुढील कामकाज पार पाडून हाॅटेल ग्राहकांच्या सेवेत रुजू केले आहे.ग्राहकांनी अवर्जुन या हाॅटेल ला भेट द्यावी असे आवाहन शिवम घोगरे यांनी केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सर्व सुवीधा उपलब्ध असलेले हाॅटेल या हायवेवर उपलब्ध झाल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts