loader
Breaking News
Breaking News
Foto

रानभाज्यांचे संवर्धन काळाची गरज : सभापती ननवरे

रानभाज्यांचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

ते महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये रानभाज्यांच्या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी सभापती ननवरे पुढे म्हणाले कि, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या खाणे गरजेचे आहे. तालुका पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती पै.दत्तात्रय सरडे म्हणाले की वर्षातून एकदाच ते पण विशेषतः पावसाळ्यात मिळणाऱ्या या रानभाज्या म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. विशिष्ट परिस्थितीत अनुकूल वातावरणात नैसर्गिकरीत्या येणाऱ्या या भाज्या आरोग्यदायी असून विविध जुनाट आजारांवर तथा दुर्धर आजारांवर रामबाण इलाज आहे. यातील विविध घटक आणि ॲन्टी ऑक्सीडंटस् मानवी शरीराला किफातशीर आहेत.त्यामुळे या भाज्यांच्या संवर्धनासाठी आपण अविरत प्रयत्न करून त्यांचा मूळ अधिवास जतन आणि संरक्षित करणे गरजेचे आहे. या प्रदर्शनाला बहुसंख्य हौशी लोकांनी भेटी दिल्या व या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले. सदर रानभाजी महोत्सवासाठी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवामध्ये प्रदर्शित केलेल्या रानभाज्यांचे फित कापून उदघाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे कृषि विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रानभाज्याची विक्री केली तर करमाळा शहर व परीसरातील ग्राहकांनी या रानभाज्या खरेदी करून उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी सुरज पाटील यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत सहाय्यक तंत्रज्ञ सत्यम झिंजाडे यांनी मानले.तर आभार आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अजयकुमार बागल यांनी मानले.

तालुका प्रतीनिधी

यावेळी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती तथा महाराष्ट्र चॅम्पियन दत्तात्रय सरडे, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व करमाळा नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वीणा पवार उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts