वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या करता कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. यासाठी लाखो रुपयांपर्यंत खर्च शासनाकडून केला जातो. मात्र वनविभागा काडुन पाणी सोडण्यासाठी कुचराई केली जात असल्याने हे पाणवठे करोडे ठाक पडले असून वन्यजीवांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.
करमाळा जेऊर रोडवर तसेच विट, मोरवड रोडवर वनविभागाचे मोठे अभयारण्य असून या अभयारण्यात अनेक कृत्रिम पाणवटे व त्यात पाणी सोडण्यासाठी हातपंप केलेले आहेत मात्र पाणी सोडण्यासाठी हलगर्जी होत असल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जात आहे. पाण्यासाठी भटकंती करत असताना मागील काही वर्षांपुर्वी रस्ता ओलांडताना एक हरणाचा अज्ञात वाहनाने धडक देऊन मृत्यु झाला होता.तरी देखील करमाळा वनविभाग सतर्क झालेले नाही
वनविभागाकडुन सोय होत नसेल तर आम्ही सोय करू वनविभाग जर मुक्या प्राण्यांना पाणी देण्यास सक्षम नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावे आम्ही स्वखर्चाने पाणी देऊ. व आमची कोतणी तक्रार देखील नसणार आहे मात्र आम्हाला करु नका म्हणून सांगायचे आणी स्वतः पण पाणी सोडण्यास टाळाटाळ करायची हे चुकीचे असून मुक्या प्राण्यांची गैरसोय तात्काळ थांबवावी. -सचिन गायकवाड संस्थापक स्व बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठान करमाळा
मध्यंतरी पाणवठे असून सुद्धा वन्यजीवांची पाण्यासाठी होत असलेली वणवण थांबवण्यासाठी करमाळा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्व बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठान च्या वतीने टँकर द्वारे या पाणवठ्यात पाणी सोडण्यात येत होते .तसेच पक्षांसाठी शेकडो झांडावर धान्य ठेवण्याची व्यवस्था केली होती.गेली तिन वर्षापासुन या प्रतिष्ठानमार्फत हा उपक्रम सुरु होता मात्र वनविभाग काय करतय अशा तक्रारी काही नागरिक यांनी उपस्थित केल्यानंतर वनविभागाकडुन प्रतिष्ठान चे संस्थापक सचिन गायकवाड यांना तुम्ही पाणी सोडु नका आम्ही सर्व व्यवस्था केली आहे असे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात हे पाणवठे कोरडे ठाक असल्याचे दिसून येत असून वन्यजीवांची पाण्यासाठी प्रंचड वणवण सुरु आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.