loader
Breaking News
Breaking News
Foto

शाश्वत विकासाच्या नावाखाली स्वतःची निष्क्रियता झाकू नका - आमदार शिंदे यांना प्रवक्ते सुनील तळेकर यांचा टोला.

शाश्वत विकासाच्या नावाखाली स्वतःची निष्क्रियता झाकू नका असा मार्मिक टोला पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आ. संजयमामा शिंदे यांना लगावला. काल अर्जूननगर ता.करमाळा येथे आ. शिंदे यांच्या उपस्थितीती मध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी माजी आमदार नारायण पाटील गटातून काही कार्यकर्त्यांनी आ. शिंदे गटात प्रवेश केला. या कार्यक्रमात आ. शिंदे यांनी केलेल्या भाषणाचा आज प्रवक्ते तळेकर यांनी समाचार घेतला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी प्रतिक्रिया देताना तळेकर म्हणाले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या सन 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कालावधीत करमाळा मतदार संघात वीज, सिंचन,आरोग्य व दळणवळण या बाबत ठोस भूमिका घेतली गेली. यातूनच मग पायाभुत सुविधा नियोजनावर भर देऊन विकासकामे करण्यात आली. वीजे बाबत नवीन उपवीजकेंद्राचे निर्माण केले गेले तर कार्यरत उर्वरित सर्व उपवीजकेंद्रात अतिरिक्त फिडर बसवून क्षमतावाढ करण्यात आली आहे. यामुळे आता विद्यमान आमदार यांनी पायाभुत सुविधा उभारणी करायची अशी दिशाभूल करुन सद्याच्या वीज प्रश्नांकडे डोळझाकपणा करु नये. उपलब्ध आहे ती वीज शेतकऱ्याला पुर्णदाबाने व अखंडीपणे देण्यात आमदार शिंदे अपयशी ठरले आहेत. महावितरणकडून वीजबिल वसूली मोहिम चालू असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उलट वीज कपात करण्याचे पत्र देणाऱ्या आमदारांनी उर्जा विकास व नियोजन याबाबत बोलू नये. राज्याचा अर्थसंकल्प हा आमदारांच्या प्रगतीपुस्तका समान असतो. मागील एकाही अर्थसंकल्पात दहिगाव उपसा सिंचन व कुकडी प्रकल्पासाठी एक रुपयाचाही निधी मंजुर करता नाही आल्याने आमदार संजय शिंदे हे आमदारकीच्या या पेपरमध्ये नापास झाले आहेत. दहिगाव उपसा व कुकडी प्रकल्प या दोन्हीच्या सुप्रमा मंजूर असतानाही यावर निधी न मिळणे हे आमदार महोदयांचे अपयश आहे. सध्या आमच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी आ. शिंदे गटात प्रवेश केला ही वस्तुस्थिती आहे. परंतू या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे आम्ही गट बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. पण तरीही पुर्व भागात आमच्या गटास भगदाड पडले अशी शिमगा बोंब विरोधक मारत असून यात दम नाही. करमाळा तालुक्यातील पुर्व भाग हा आमचा बालेकिल्ला असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वावर या भागातील लोकांचा पुर्ण विश्वास आहे. आज पाटील गटास आ. शिंदे नखं लावण्याचा वारंवार प्रयत्न करत असून आगामी निवडणुकीत त्यांचा हा प्रयत्न किती असफल होता हे दिसून येईल.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण पाटील यांना मिळालेले मताधिक्य घटवून भविष्यात आजच्या शिंदे गटास साथ देणाऱ्या सहकारी गटांना बाजूला सारुन एकहाती व स्वतः च्या बळावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न व नियोजन आमदार संजयमामा शिंदे हे करत आहेत असा आरोप करत तळेकर यांनी सावंत, देवी व जगताप गटाला देखील अप्रत्यक्ष सुचक इशारा दिला असुन. आमच्या गटाला फारसा धोका नसल्याचे म्हटले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

लवकरच माजी आमदार नारायण पाटील यांचा गावभेट दौरा सुरु होणार आहे व यात कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार असल्याचेही प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts