loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकऱ्यांच्या समस्यांवर तात्पुरता इलाज शोधण्या ऐवजी कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार- आमदार संजयमामा शिंदे

विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यामध्ये सातत्य असायला हवे. रस्ते, वीज, पाणी या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या आहेत. या समस्यावरती तात्पुरता उपाय शोधण्याऐवजी आपण कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील असून करमाळा तालुका शाश्वत विकासाकडे येण्यासाठी काही वेळ लागेल. परंतु रिजल्ट निश्चित मिळतील असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी अर्जुननगर येथील आ. संजयमामा शिंदे गट प्रवेश व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, शेतामध्ये पाणी आले की समृद्धी आली असे होत नाही. पाण्यानंतर वीज ही शेतकऱ्यांची महत्त्वाची गरज आहे. पुढील 5 वर्षाचा आराखडा डोळ्यापुढे ठेवून करमाळा मतदारसंघांमध्ये विजेची समस्या भेडसावणार नाही या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या भागांमध्ये नव्याने सबस्टेशन मंजुरीसाठी आपण प्रयत्नशील आहोत . कोळगाव या ठिकाणी 5 mv चा नवीन ट्रांसफार्मर बसविण्याचे काम लवकरच मंजूर होईल .तसेच आवाटी व राजुरी येथे नव्याने सबस्टेशन उभारणी ही कामे प्रस्तावित आहेत. तसेच सौंदे, वांगी, पोमलवाडी आदी ठिकाणी सबस्टेशन होण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब अडसूळ यांनी केले. यावेळी उमेश मगर, दादासाहेब सांगडे, एड. अजित विघ्ने, चंद्रकांतकाका सरडे, शितल शिरसागर, विलास पाटील ,प्रकाश थोरात आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी कै. नामदेवराव जगताप यांच्यापासून विकासाची प्रक्रिया तालुक्‍यांमध्ये सुरू असून त्याचा वेग वाढविण्याचे काम आमदार संजयमामा शिंदे यांनी 2019 पासून केले आहे. त्यांच्या प्रत्येक कामात आपले कायमस्वरूपी सहकार्य असणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी तानाजी बापू झोळ, एड. राहुल सावंत, सुजित बागल, बाळूनाना जगदाळे, भरत अवताडे ,संदीप नेटके, प्रदीप दौंडे, अशोक काटोळे, राहुल कुकडे, समाधान दौंड, समाधान भोगे,स्नेहल अवचर, रूपाली अंधारे, सागर अंधारे यांचेसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

पूर्व भागामध्ये नारायण पाटील गटाची पकड मजबूत होती. परंतु या वर्षभरामध्ये पूर्व भागात पाटील गटाला मोठे भगदाड पडले आहे. यामध्ये हिवरे येथील उमेश मगर, फिसरे येथील संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच अर्जुननगर येथील आज झालेला प्रकाश थोरात यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा प्रवेश, पांडे येथील नाना अनारसे या युवा नेतृत्वाने आमदार शिंदे यांच्या गटांमध्ये केलेला प्रवेश यामुळे माजी आमदार पाटील गटाला पूर्वभागात मोठे भगदाड पाडन्यामध्ये विद्यमान आमदार संजयमामा शिंदे गटाला यश आले आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts