loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार शिंदे यांची कार्यपद्धती सर्वांना सामावून घेण्याची आहे असे म्हणत अर्जनगर येथील थोरात यांचा पाटील गटाला रामराम

आमदार शिंदे यांची कार्यपद्धती सर्वांना सामावून घेण्याची आहे असे म्हणत अर्जनगर येथील सरपंच प्रतिनिधी व माजी आमदार नारायण पाटील यांचे कट्टर समर्थक प्रकाश येथील थोरात यांनी पाटील गटाला शेवटचा रामराम केला असून उद्या आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांच्या उपस्थितीत ते सरपंच सदस्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान थोरात यांच्या प्रवेशाची कुणकुण लागताच स्वतः माजी आमदार पाटील यांनी थोरात यांच्या घरी भेटून अडीच तास चर्चा करून थोरात यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला मात्र थोरात आपल्या निर्णयावर ठाम राहिले अशी चर्चा सुरु आहे.अर्जुननगर हि पुर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाची ग्रामपंचायत आहे. या पुर्वी बागल गटाचे या गावावर वर्चस्व होते .मात्र पाटील गटाकडून मागील निवडणुकीत बागल यांचा पराभव करत ग्रामपंचायत ताब्यात घेतली होती.थोरात यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याने अर्जुननगर आयतेच शिंदे गटाच्या ताब्यात गेले आहे.या पुर्वी फिसरे, हिवरे या गावातील पाटील व बागल गटाचे कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

उद्या होणाऱ्या या प्रवेशा सोहळ्यात अर्जुन्नगर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.अश्विनी प्रकाश थोरात तसेच ग्रामपंचायत सदस्य बापू ढवळे ,त्रिंबक ननवरे ,भाऊसाहेब आडसूळ या ग्रामपंचायत सदस्यांसह पांडे गावचे युवा नेते नाना अनारसे विलास ननवरे, माजी सरपंच सुनील लोखंडे, सरपंच प्रतिनिधी प्रकाश थोरात, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत आतकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश पाटूळे ,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष उद्धव पाटूळे , युवा नेते अनिल पवार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता हांडे, युवा नेते कुंडलिक आतकरे, दादासाहेब ननवरे , बाळूनाना अडसूळ हे सर्व प्रवेश करणार आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दरम्यान चौफेर शी बोलताना विकासाच्या मुद्द्यावर आमदार शिंदे गटात प्रवेश करत असून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी अर्जुननगर तसेच मसेवाडी तलावाला नियमितपणे मिळावे ,अर्जुननगर गावांचा शिव रस्त्यांचा प्रश्न सुटावा या विकासाच्या मुद्द्यावरती आपण आमदार शिंदे यांच्या गटात प्रवेश करत असल्याचे प्रकाश थोरात यांनी सांगीतले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आमदार संजयमामा शिंदे गटाकडून सातत्याने पाटील व बागल गटाचे कार्यकर्ते गळाला लावले जात आहेत आगामी जिल्हापरिषद पंचायत समितीच्या निवडणुका पाहता डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी पाटील बागल गट काय भुमीका घेतात या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts