सुप्रमाचा भोंगा वाजवणाऱ्या आ. संजयमामा शिंदे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी किती निधी मंजूर करुन आणलाअसा सवाल आज पाटील गटाकडून करण्यात आला.पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी हा सवाल करत आ. शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टिका केली.यावेळी बोलताना तळेकर म्हणाले की राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत पार पडले. दिनांक 11 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील इतर आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील सिंचन प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या निधीची माहिती वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली. आमच्यासह करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील शेतकरी मोठ्या आशेने दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक होता. आ. संजयमामा शिंदे हे निधी मिळवतात का याची वाट पहात होता. परंतू या योजनेस वाढीव सुप्रमा असतानाही निधी दिला गेला नाही कारण आ. शिंदे यांनी यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत.कोरोनाच्या मागील दोन वर्षांच्या काळामध्ये अर्थसंकल्प अधिवेशन हे जेमतेम 8 दिवसांचे होते. तर यंदाचे अधिवेशन हे 22 दिवसांचे होते. मग आमदार संजयमामा शिंदे यांना दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी निधी का मिळवता आला नाही ? एरव्ही सुप्रमाचा भोंगा अनेक दिवसांपासून वाजत होता पण या भोंग्याचा आवाज अधिवेशन काळात वाजलाच नाही.सन 2019 नंतर आजपर्यंत दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी किती निधी मिळाला व यातून किती काम झाले याचा हिशोब आ. शिंदे यांनी द्यावा.
अधिक बोलताना तळेकर म्हणाले केवळ आयत्या पीठावर रेघोट्या मारुन आवर्तने देण्यात आमदार शिंदे यांनी धन्यता मानू नये. माजी आमदार नारायण पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवला व नंतर सलग पाच अर्थसंकल्प अधिवेशनात या योजनेसाठी निधीही मंजूर करण्यात यश मिळविले. माजी आमदार नारायण पाटील यांनी या योजनेसाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद लेखी स्वरूपात विधीमंडळाच्या कामकाजात आहे. आ. शिंदे यांना ती माहिती पहाता सुध्दा येईल. माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच सतरा वर्षे रखडलेली हि योजना पुर्ण झाली. परंतू विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या निष्क्रियतेमुळे आज या योजनेच्या एकुण 10 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याच्या उद्देशास बाधा येत आहे. केवळ कागदोपत्री खेळ मांडत आ. शिंदे हे माजी आमदार पाटील यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेत आले आहेत.
आमदारकीचा अर्धा कालावधी संपला तरी अजूनही प्रत्यक्षात एकही ठोस काम निधी आणून पुर्ण करण्यात आमदार संजयमामा शिंदे हे सपशेल अपयशी ठरले आहेत. कोणत्याही अर्थसंकल्पाच्या एक महिना अगोदर शासनाच्या प्रत्येक विभागास मंत्रालयीन पातळीवरुन आपल्या अधिकारक्षेत्रातील अपुर्ण कामांच्या तपशीलाबाबत माहिती अधिकार्यांना संकलित करण्यास आदेश पारित केले जातात.यातुनच मग मतदार संघात कार्यरत संबंधित विभागाचे अधिकारी विविध कामांसाठी निधी मागणी करतात. आता या अधिकारी पातळीवरील प्रयत्नातून करमाळा मतदार संघासाठी आलेला निधी हा आपणच मंजूर करुन घेतल्याचा आव संजयमामा शिंदे आणत आहेत. आमदार म्हणून आ. संजयमामा शिंदे यांना आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी मतदार संघात काही महत्वकांक्षी योजना व कामे अर्धवट आहेत. यामुळे स्वतःचे कर्तृत्व त्यांना सिद्ध करायचे असेल तर इतरांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचे हे प्रयत्न आमदार महोदयांनी वेळीच थांबवावेत. दहिगाव उपसा सिंचन योजनेचा लाभ आजही संपूर्ण कार्रक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत नाही. केवळ मुख्य प्रवाहात पाणी सोडुन या योजनेचे श्रेय घेऊन किती दिवस समाधान मानणार आहात. संपूर्ण 10 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले तरच या योजनेचा खरा लाभ पुर्व भागास होणार आहे. यामुळे आता सुप्रमाचा भोंगा सकाळ संध्याकाळ प्रत्येक सभेतून वाजवणे बंद करुन पुढील अर्धवट कामे पूर्ण करुन दाखवावीत,असे आवाहन पाटील गटाच्या वतीने प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.