loader
Breaking News
Breaking News
Foto

साहेब आता वाजवू का? बॅण्ड पथक कलाकारांची परवानगी साठी धावपळ.

कोरोना मुळे प्रत्येक उद्योग धंदे अडचणीत सापडले आहेत. सर्व क्षेत्रावर कोरोनाचा परिणाम झाला असुन वाद्यकाम करणारे कलाकार देखील अडचणीत सापडले आहेत. सहा महिन्या पासुन, सुपारी, बारसे, साखरपुडा ,राजकीय सभा, यात्रा विवाह सोहळे बंद होते त्या मुळे बॅण्ड पथकातील कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सध्या शासनाने सोशेल डिस्टेनस ठेवुन विवाह, सोहळे तसेच इतर छोट्या मोठ्या उत्सवाला परवानगी दिली आहे मात्र बॅण्ड पथक लावण्यास मात्र परवानगी दिलेली नसल्याने बॅण्ड पथक कामगारांची उपासमार सुरु आहे. आत्ता किती दिवस घरात बसायचे असा सवाल ते करत आहेत. "लग्न समारंभाला परवानगी देता मग आमची अडवणुक का ?" असा सवाल करत साहेब आत्ता वाजवू का ?अशी विचारणा बॅण्ड पथक संघटना करत आहेत

गेल्या सहा महिन्यांपासून कलाकार बसून आहेत त्यांच्या रोजीरोटीचा सवाल निर्माण झाला असून अशा या हलाखीच्या परिस्थिती मध्ये सरकार ने आमचा देखील विचार करावा व अनलाॅक दरम्यान नियमात अधिन राहून वाद्ये वाजविण्यास परवानगी द्यावी अशी विनंती या पदाधिकारी यांनी केली आहे. .

तालुका प्रतिनिधी सा चौफेर

करमाळा तालूका बॅण्ड व बॅन्जो असोसिएशन च्या वतीने नियमात राहून शेजारील उस्मानाबाद जिल्ह्याप्रमाणे वाहन व पाच माणसांना परवानगी भेटावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी पालकमंत्री तसेच आमदार रोहीत पवार आ संजयमामा शिंदे यांना या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन व्यथा मांडल्या आहेत. मात्र अजुन तरी कोणीही दखल घेतली नसल्याची दिसत आहे. करमाळा ता बॅण्ड व बॅन्जो असोसिएशन च्या वतीने अध्यक्ष मो हाफीज कूरेशी कार्याध्यक्ष सूनील शिंदे,नासीरभाई शेख,जावेद पठाण,गोरख शिंदे,प्रमोद लांडगे,मूख्तार पठाण,जमीर पठाण जावेद पठाण हमीद पठाण,बिनू जाधव,दिलीप पवळ दिलीप चव्हाण इसाकभाई पठाण मस्तानभाई शेख हे संघटनेचे पदाधिकारी कलाकारंचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts