loader
Breaking News
Breaking News
Foto

विस वर्ष रखडलेला प्रश्न आमदार शिंदे यांनी सोडवला,तालुक्यातील तिन गावातील शेतकऱ्यांना मिळणार 5 कोटींची मदत !

करमाळा तालुक्यातील अर्जुननगर, निंभोरे व विहाळ या तिन गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी पाटबंधारे विभागाच्या साठवण तलावासाठी संपादित केल्या गेल्या होत्या मात्र अनेक वर्षांपासून भूसंपादनाचे पैसे मात्र काहिकेल्या मिळत नव्हते. अखेर आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून विस वर्ष रखडलेला हा प्रश्न सुटला असून अर्जुनगर, निंभोरे व विहाळ येथील तलावग्रस्त शेतकऱ्यांना पाच कोटींचा भूसंपादन मोबदला मिळणार आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून आमदार संजय मामा शिंदे यांनी संबंधित विषयी पाटबंधारे विभागाला पत्र देऊन व त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या 3 गावांसाठी 5 कोटी 5 लाख निधी मंजूर झाला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

त्यामुळेच अर्जुननगर येथील तलावाच्या भूसंपादन साठी रु 79.48 लक्ष, निंभोरे या तलावाच्या भूसंपादनासाठी 1 कोटी 81 लक्ष व विहाळ या तलावाच्या भूसंपादनसाठी 2 कोटी 45 लक्ष असा एकूण 5 कोटी 5 लाख निधी मिळालेला आहे. संबंधित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर या निधीचे वाटप केले होणार आहे.या संबधीचे निवेदन जिल्हा संधारण अधिकारी अ.चं. कदम यांनी जारी केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आ. संजयमामा शिंदे यांच्या या कामाचे शेतकऱ्यांकडून कौतुक होत असून निंभोरे येथील युवक नेते रवींद्र वळेकर म्हणाले की आमच्या निंभोरे गावातील साठवण तलाव जवळपास 20 वर्षांपूर्वी झालेला होता. सदर तलावात 22 शेतकऱ्यांची 9 हेक्टर 26 आर जमीन गेलेली होती. तेव्हापासून शेतकरी भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित होते. या प्रलंबित प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी आ. संजयमामा शिंदे यांच्याकडे केली.मामांनी तात्काळ जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा केल्यामुळे निंभोरे येथील तलावासाठी 1 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .याबद्दल आमचे सर्व ग्रामस्थ आमदार शिंदे यांचे मनापासून आभारी आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts