loader
Breaking News
Breaking News
Foto

आरपीआय(आ) कामगार आघाडीच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवणार- यशवंतभाऊ गायकवाड

आरपीआय चे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी भर देणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) हा शोषित पिडीत कष्टकरी मजूर कामगारांचे हित जोपासणारा पक्ष असल्याने सर्व जाती धर्मातील कामगार आरपीआय मध्ये सामील होत असल्याचे मत आरपीआय कामगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष यशवंतभाऊ गायकवाड यांनी व्यक्त केले. करमाळा येथे झालेल्या कामगार आघाडी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळेस तालुका अध्यक्ष अर्जुन गाडे उपस्थित होते. या बैठकीत आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने व कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी निवडी पार पडल्या. कामगार आघाडीच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी आरुण नागटिळक यांची तर कार्याध्यक्ष म्हणून मा.सुरेश जाधव, सरचिटणीस म्हणून मा.निलेश मोरे, उपाध्यक्ष म्हणून मा.युवराज जगदाळे, मा.अमोल शेलार तर सचिव पदी श्री घाडगे यांची यांची निवड करण्यात आली.या बैठकी नंतर आरपीआय च्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी अधिक बोलताना गायकवाड म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ हा शोषित पिडीत कष्टकरी मजूर कामगारांचे हित जोपासणारा पक्ष आहे, त्यामुळे मा.ना.आठवले साहेबांच्या आदेशान्वये व प्रदेशाध्यक्ष मा.प्रदिपभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये कामगार आघाडीचे पदाधिकारी निवडी होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून करमाळा तालुका कार्यकारिणी जाहीर केलेली आहे, इथून पुढे सर्व पदाधिकार्यांनी गाव,/वाडी,/नगर तिथे कामगार आघाडीची शाखा स्थापन करून,पक्ष वाढीबरोबर कामगार, बांधकाम कामगार,मजुरांच्या व शेतमजुरांच्या प्रश्नावर आवाज उठवून , कामगारांना न्याय मिळवून देण्याचे व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी तालुकाध्यक्ष अध्यक्ष अर्जुन गाडे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश धेंडे,ता.सरचिटणीस राजाभाऊ सरतापे, ता.युवकाध्यक्ष मच्छिंद्र चव्हाण,सुरेश जाधव, आकाश शेलार, निलेश मोरे,व भैय्या जगदाळे यांची भाषणे झाली.गणेश शेलार,लक्ष्मण सरतापे, आकाश शेलार,दादा जगदाळे,आतुल नागटिळक,आन्ना नागटिळक भैय्या मोरे, अभिजीत रणदिवे, महावीर रणदिवे,व इतर भिम सैनिक उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts