सन 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत दिनांक 31 मार्च 2022 च्या शासन अध्यादेशानुसार करमाळा तालुक्यातील व 36 गावातील 100 गावांसाठी प्रत्येकी 5 लाख याप्रमाणे 5 कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील घरतवाडी, कुंभारगाव, सावडी, कोर्टी, रावगाव, जातेगाव, आळजापुर, मांगी, वडगाव, भोसे, विट, राजुरी, दिवेगव्हाण ,देलवडी ,रामवाडी, हिंगणी, वाशिंबे, उंदरगाव, मांजरगाव इत्यादी व 36 गावातील कन्हेरगाव ,दहिवली, उपळवटे, ढवळस, जाखले, रोपळे क, लोणी, मुंगशी आदी गावामध्ये सामाजिक सभागृह बांधणे, गावांतर्गत व वाडीवस्तीवर रस्ते मुरमीकरण करणे , पेविंग ब्लॉक बसविणे, गटर कामे करणे तसेच इतर सोयी सुविधा पुरवणे या कामांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपये निधी प्रत्येक गावाला मंजूर झालेला आहे.
निधीमधून गाव सामाजिक सभागृह, रस्ता मुरमीकरण , पेविंग ब्लॉक बसविणे, गटर कामे करणे यापैकी कोणतेही 1 काम या निधीमधून करू शकते. ग्रामीण भागातील गावांतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी हा 5 कोटी निधी महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.