loader
Breaking News
Breaking News
Foto

११ एप्रिल रोजी जुनी पेंशन संघटनेचे जिल्हापरिषद समोर धरणे आंदोलन,शिक्षकांनी बहुसंख्येने सामील व्हावे- तात्यासाहेब जाधव

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या वतीने मागील दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करुनही सोडवणूक झालेली नाही. प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात शिक्षकांच्या मनात प्रचंड असंतोष असून तो व्यक्त करण्यासाठी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन सोमवार दि.११ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेसमोर करण्यात येणार आहे .या आंदोलनास जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षकांनी सामील व्हावे असे आवाहन संघटनेचे जिल्हानेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अधिक बोलताना जाधव म्हणाले की गेल्या दोन वर्षांपासून कोरोना कालावधीत अनेक आव्हानात्मक परिस्थितीत ऑनलाईन तासिका , पारावरची शाळा , स्वाध्यायपुस्तिका , उपक्रम कार्ड , गृहाभेटी इ. माध्यमातून आपले कर्तव्य उत्कृष्ट पद्धतीने बजावले आहेत . त्याचा परिणाम म्हणूनच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचा मुख्यमंत्री व राज्यसरकार व विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले आहे .परंतु दरम्यानच्या कालावधीत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शिक्षाकांचे बरेच प्रश्न गेली ३-४ वर्षे प्रलंबित राहिलेली आहेत , जसे की1) बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती करणे व समाजशास्त्र नकार मंजूर करावेत.2) Dcps धारकांचा कपातीचा हिशोब हिशोब चिठ्ठीसह देणे.जमा रक्कम व्याजासह एनपीएस खात्यावर वर्ग करण्यात यावी.3) कन्नड व उर्दू माध्यमाच्या सर्व संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया तातडीने पार पाडावी.4) शिक्षकाचे प्रलंबित वैद्यकीय बीले मंजूर करणे.5) शिक्षकांचे नियमित वेतन वेळेवर देणे. 6) दोन वर्षांपासून पात्र शिक्षकांना चटोपाध्याय निवडश्रेणी मंजूर करणे.7) ३१ मार्च २०२२ अखेर चट्टोपाध्याय पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मागवून तातडीने मंजूर करण्यात यावेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करुनही सोडवणूक झालेली नाही. प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात शिक्षकांच्या मनात प्रचंड असंतोष असून तो व्यक्त करण्यासाठी संघटनेच्या वतीने सोमवारी , दिनांक : ११ एप्रिल २०२२ रोजी जिल्हा परिषद पूनम गेट समोर सोलापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असून सदर आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे साडे चार हजार शिक्षक सहभागी होतील . अशी माहिती पत्रकाद्वारे संघटनेचे जिल्हानेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळेस जुनी पेंशन हक्क संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts