कोर्टाने वाढीव रक्कम देण्याविषयीचे आम्हाला निर्देश दिले. तर आम्ही त्या निर्देशाचा आदर करुन तुम्हाला न्यायालयाच्या वाढीव रकमेच्या निकालानुसार पैसे देण्यासाठी बांधील राहु असे अश्वासन राज्य शिखर बॅंकेचे कार्यकारी संचालक देशमुख यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना दिले असल्याची माहिती शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे यांनी सा करमाळा चौफेर ला दिली आहे.
यावेळेस अधिक बोलताना दशरथ कांबळे यांनी सांगीतले की ,श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना येथील कामगारांचे सहा वर्षापासूनचे थकित पगारामुळे, कामगारांनी कारखान्यातील साखर अडवून ठेवली होती. व साखर विक्रीतून कामगारांच्या पगारीचा प्रश्न सोडवावा अशा प्रकारची मागणी कामगार सातत्याने करत होते. याच अनुषंगाने सोलापूर औद्योगिक न्यायालयाने 2020 साली साखर विक्री संबंधात निकाल दिला होता की, कारखान्यातील साखर विक्रीतून १५० रु. कामगारांच्या थकित पगारासाठी द्यावेत. व १५० रु. कारखाना सुरू करण्यासाठी वापरावेत. परंतु त्या वेळच्या संचालक मंडळाने न्यायालयाच्या निकालाकडे हवे तसे लक्ष न दिल्यामुळे, कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. व कामगारांनीही कारखान्यातील साखरेतुनच पगारी झाल्या पाहिजेत या मुद्द्यावर आंदोलने केली. त्याच अनुषंगाने दि. १ एप्रिल रोजी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील शिल्लक असलेली साखर घेऊन जाण्यासाठी शिखर बँकेचे अधिकारी आले होते. त्यांना काही प्रमाणात कामगारांनी विरोध केला परंतु, अधिकाऱ्यांनीही फक्त आज आम्ही दोन ट्रक साखर घेऊन जाणार आहोत. व पुढच्या वेळची साखरेसंबंधीची वाहतुक ही शिखर बँकेचे कार्यकारी संचालक देशमुखसाहेब यांच्याशी चर्चा जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत आम्ही कारखान्यातील साखर घेऊन जाणार नाही!!!! असे आश्वासन संबधित बँक आधिकाऱ्यांनी दशरथ कांबळे यांना दिले होते. त्यावेळी याविषयीची हमी करमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घेतली होती. व त्या अनुषंगानेच दि. ४ एप्रिल रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या दालनामध्ये शिखर बँकेचे कार्यकारी संचालक देशमुखसाहेब, पुणे विभागाचे प्रमुख राठोडसाहेब व त्यांच्यासोबत शिखर बँकेचे 3 ते 4 आधिकारी याबरोबरच चर्चेसाठी यांच्यासोबत शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगार नानासाहेब साखरे, विजय शिंदे, महादेव मस्के आदि जणांनी खेळीमेळीच्या वातावरणात सविस्तर अशी चर्चा केली. हि चर्चा किमान २ ते अडीच तास चालली असे देखील कांबळे यांनी सांगीतले.
या चर्चेअंती कामगारांसाठी बँकेने ही सकारात्मक भूमिका दर्शवली. व सांगितले की, 2020 साली जो औद्योगिक न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्या निकालाच्या अनुषंगाने आम्ही कामगारांच्या खात्यावर साखर विक्रीतून पैसे जमा करण्यास तयार आहोत. व कामगारांना 2020 साली झालेल्या दीडशे रुपयांच्या निकालापेक्षा आणखी वाढीव रक्कम हवी असल्यास, तशा प्रकारे त्यांनी त्यांचे म्हणणे कोर्टामध्ये मांडावे. जर कोर्टाने वाढीव रक्कम देण्याविषयीचे आम्हाला निर्देश दिले. तर आम्ही त्या निर्देशाचा आदर करुन तुम्हाला न्यायालयाच्या वाढीव रकमेच्या निकालानुसार पैसे देण्यासाठी बांधील राहु. अशा प्रकारचे आश्वासन उपस्थित शिखर बँकेचे कार्यकारी संचालक देशमुख व राठोड तसेच उपस्थित इतर अधिकारी वर्गाने दिलेले आहे. यावेळेस देशमुखसाहेब यांनी सांगितले की, कारखाना सुरू व्हावा अशी आमची ही मनोमन इच्छा आहे. कारण कारखान्याच्या अवतीभोवती उसाचे मोठे क्षेत्र आहे. व कारखाना बंद राहिल्यामुळे तालुक्याची आर्थिक घडी बंद पडलेली दिसून येत आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न व इतर अनेक अडचणींना कारखान्यावर अवलंबून असलेल्यांना मानसिक त्रासातून सामोरे जावे लागत आहे हे आम्ही जाणतो. परंतु आम्ही ही शासनाचे बांधील नोकर आहोत. आम्हाला ही शासनाच्या नियमानुसार सर्व गोष्टी कराव्या लागतात. कारखाना सुरू करण्यासंबंधीच्या सर्वच प्रोसेस जवळजवळ पूर्ण होत आलेल्या आहेत. व कारखाना लवकरात-लवकर सुरू होईल अशी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. असेही आशादायक वक्तव्य शिखर बँकेचे कार्यकारी संचालक देशमुखसाहेब यांनी केले आहे. यावेळी दशरथ कांबळे यांनी कामगारांच्या सध्याच्या ज्वलंत मुद्याकडे लक्ष वेधत असताना कि, सध्या कामगार कॉलनीमध्ये वीज आणि पाण्याचा मुद्दा गहण होत चालला आहे. कारखाना प्रशासनाने वीजवितरण महामंडळाचे ३५ लाख रु.चे वीजबील थकित ठेवल्यामुळे, कारखाना परिसरातील वीज व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्यासाठी उन्हामध्ये घरातील स्त्रीयांना दुरपर्यंत भटकावे लागते. त्याचप्रमाणे मुला-मुलींना अभ्यासासाठी सुध्दा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणींविषयी तेजस्वी सातपुते यांनी बोलताना सांगितले कि, मी स्वतः आ. रोहितदादा पवार यांच्याशी या सर्व विषयावर सविस्तर चर्चा करुन, कामगारांच्या वीज आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन. अशाप्रकारचे त्यांनी आश्वासन दिले.आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या प्रश्नासाठी महत्त्वपूर्ण अशी चर्चा घडवून आणणाऱ्या पोलिसांचे याठिकाणी खूप मोठे योगदान लाभले आहे. हि महत्त्वपूर्ण चर्चा तेजस्वी सातपुते-सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक, जाधवसाहेब-सोलापूर ग्रामीण पोलीस उपअधिक्षक, विशाल हिरे-DYSP, सुर्यकांत कोकणे- करमाळा पोलीस निरिक्षक, ॲड.जाधव (कामगारांचे वकिल), दत्ता अडसुळ, आदिजन यावेळेस उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.