loader
Breaking News
Breaking News
Foto

दिलीप स्वामी हेच आत्ता जिल्हापरिषद चे 'स्वामी' पदाधिकाऱ्यांची वाहने जमा ,दालने होणार बंद.

जिल्हापरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांचा कार्यकाळ संपला असून जिल्हापरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींची वाहने शासकीय वाहने प्रशासकाकडे जमा केली असुन पदाधिकाऱ्यांची शासकीय दालने देखील बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रशासक म्हणून जिल्हापरिषद चे मुख्याधिकारी दिलीप स्वामी हेच प्रशासक असल्याने दिलीप स्वामीच आत्ता जिल्हापरिषदेचे 'स्वामी' असणार आहेत.स्वामी यांना जिल्हापरिषद मार्फत सुरु असलेल्या शालेय पोषण आहार योजना, कृषीविषयक योजना, मंजुर असलेली ग्रामवीकासाची कामे,आरोग्य विभागाची कामे नवीन पदाधीकारी निवडी पर्यंत या माजी पदाधिकाऱ्यांशी समन्वयक ठेवून पार पाडावी लागणार आहेत.जिल्हापरिषद चे एकुण ६७ जिल्हापरिषद सदस्य असून ६ सदस्य विविध विषय समितीवर सभापती होते. हे सर्व जण २० मार्च पासून आत्ता माजी पदाधिकारी झाले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुक्यातुन अनिरुद्ध कांबळे, राणी संतोष वारे, सवितादेवी भोसले,निळकंठ देशमुख, लक्ष्मी आवटे हे पाच सदस्य होते .या पैकी अनिरुद्ध अनिरुद्ध कांबळे यांच्या रुपाने करमाळ्याला जिल्हापरिषद अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली होती.महाविकास आघाडी चा फाॅर्मुला अपयशी ठरवून शिवसेना भाजपा यांनी समविचारी नेते एकत्र करुन जिल्हापरिषद ताब्यात घेतली होती.या मध्ये मोहिते-पाटील गटाची भुमीका महत्वाची ठरली होती. जिल्हापरिषद अध्यक्ष पदावर संधी मिळाल्यानंतर अनिरुद्ध कांबळे यांना आपल्या कार्यशैलीची छाप सोडता आली नाही.कोरोना कालावधीत काही काळ गेल्यानंतर लसीकरण मोहीम हि जिल्हापरिषद आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असताना आमदार संजय मामा शिंदे यांचे वर्चस्व या मोहिमेवर दिसुन आले. जिल्हापरिषद अध्यक्ष यांनी मात्र केम गावातील लसीकरणावर भर दिला .आमदार यांच्या या लसीकरण मोहीमेवर मात्र जिल्हापरिषद अध्यक्ष मुग गिळून गप्प होते.संजयमामा शिंदे यांनी आमदार होण्या आगोदर जिल्हापरिषद अध्यक्ष पदाच्या माध्यमातून करमाळा व माढ्याला झुकते माप दिले होते .व याचा विधान सभा निवडणुकीत त्यांना फायदा झाला .त्यानंतर अध्यक्ष झालेल्या कांबळे यांना करमाळ्या साठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात यश आले नाही.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

जिल्हापरिषद अध्यक्ष करण्यात मोहिते-पाटील यांचे योगदान, उमेदवारी मिळवून देण्यात अजित तळेकर यांचे योगदान तर विजयी करण्यात नारायण पाटील यांची ताकद त्यामुळेच या सगळ्यांची मर्जी राखता राखता त्यांच्या नाकी नऊ आले . किंगमेकर अजीत तळेकर हे त्यांचे सारथी बनुन चोवीस तास सोबत होते.एक मित्र सभापती व एक मित्र जिल्हापरिषद अध्यक्ष केल्याने त्यांना कृष्ण, कर्ण अशा पदव्या देखील मिळाल्या परंतु जर आरक्षण नसतं तर अजितराव एवढे उदार झाले असते का ? हे त्यांनाच माहीत. मात्र तळेकर यांनी जिल्हापरिषदेचे 'तळे' खऱ्याअर्थाने राखले म्हटले तरी अतिशोक्ती वाटणार नाही.जिल्हापरिषदचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना 'किंगमेकर' यांना विचारल्याशिवाय एकही निर्णय घेता आला नाही त्यामुळे 'किंग' होवुन देखील ते 'नामधारी' राहिले असे म्हणले तरी चुकीचे ठरणार नाही. अनिरुद्ध कांबळे हे जसे सामान्य कुटुंबातील होते तसे ते सांप्रदायिक क्षेत्रातील होते ,शिवसैनिक होते ,त्यामुळेच शिवसैनिकांनी देखील कांबळे यांच्या विजयात मोलाची कामगीरी बजावली मात्र शिवसैनिकांची कामे मात्र म्हणावे तेवढ्या अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे बोलले जाते. कांबळे यांच्या कार्रकिर्दीत त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या साडेचार कोटींची वसुली मात्र चांगलीच गाजली त्यांनंतर त्यांनी "मि हे सर्वांसाठी केले असे सांगत कांबळे यांना सारवासारव करावी लागली. जिल्हापरिषद अध्यक्ष पदाचा कार्यकाळात जसा शिंदे यांना आमदारकी साठी फायदेशीर ठरला तसा कांबळे यांचा कार्यकाळ माजी आमदार नारायण पाटील यांना आगामी निवडणुकीत फायद्याचा ठरणार का हे भविष्यात समजेल.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

जिल्हापरिषद सदस्या मध्ये सविताराजे भोसले ,राणी वारे यांची कामे ठळकपणे दिसून आली.लक्ष्मी आवटे यांचे पुत्र बिभिषण आवटे यांनी देखील कामे खेचून आणली. निळकंट देशमुख यांनी नारायण पाटील यांना सोडून संजय शिंदे गटात प्रवेश केला मात्र मोठ्या प्रमाणात निधी खेचण्यात अपयशी ठरले तरी जनसंपर्क ठेवून लोकांची कामे मार्गी लावली आहेत. कोरोना काळात वारे यांचे काम सर्वात जास्त प्रभावी ठरले आहे. आगामी निवडणुकीत यातील बहुतांश जण पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत तर अनेक कार्यकाळ संपलेले पंचायत समिती सदस्य जिल्हापरिषद साठी फिल्डिंग लावत आहेत. तर काही जण आपल्या मुलांना दावेदार करत आहेत. निश्चित ज्यांचे काम असेल त्यांना उमेदवारी मिळेल पण जुन्या चेहर्‍या पैकी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्यांनाच जनता स्विकारणार आहे.मतदारसंघात न फिरकलेले व टक्केवारी गोळा करुन 'लक्ष्मीदर्शन' घेणाऱ्यांना जनता ओळखुन आहे. तसेच नेते मंडळींकडून देखील त्यांचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts