loader
Breaking News
Breaking News
Foto

'बचाव' ने हाथ टेकले तर न्याय कसा मिळणार?डांगे-बिले चिवटे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा, सभासदांचा वाढतोय पाठींबा!

आदिनाथ कारखान्याच्या भाडेपट्टी कराराबाबत आता आमदार रोहीत पवार यांनी ठाम स्पष्टीकरण दिल्याने काही सभासदांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आदिनाथ बचाव समितीने हा विषय उचलून धरला होता. परंतू पत्रकार परिषदेत बचावनेच आ रोहीत पवार यांच्या भुमिकेचे स्वागत करुन पाढव्यास कारखान्याचे काम सुरु करण्याचे आवाहन पवार यांना दिले. यावरुन आता बचावने बचावत्मक भुमिका घेतल्याची शंका सभासदांच्या मनामध्ये येत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

बचाव च्या अक्रमक भुमिकेमुळे आदिनाथ सहकारी तत्त्वावरच चालु होईल अशी अपेक्षा होती मात्र आत्ता जर 'बचाव 'जर शांत झाली तर 'आदिनाथ 'हा पुन्हा पवारांच्या घशात जाईल अशी भीती कामगार व सभासदांना वाटु लागली असून बचाव ने आत्ता अक्रमक पावित्रा घ्यावा आम्ही साथ देऊ असे सभासद व कामगार बोलताना दिसत आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

बचाव साठी पुढाकार घेतलेरे डांगे-बिले-चिवटे या त्रिकुटाने आता करमाळा तहसील समोर आमरण उपोषण अथवा धरणे आंदोलन केल्यास किंवा कायदेशीर लढाई तिव्र केल्यास आदिनाथ भाडेपट्टी पासुन वाचला जाईल अशी अपेक्षा सर्वसामान्य भोळाभाभडा सभासद मनामध्ये धरुन आहे. जर डांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालेच तर यास सभासदांचा प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदिनाथ बचाव समितीने आपला लढा थांबवू नये अशी सभासदांची अपेक्षा आहे. जर आदिनाथ बचाव समितीनेच हात टेकले तर सभासदांनी व कामगारांनी न्यायासाठी कोठे जायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डांगे-बिले यांनी आतापर्यंत हा विषय लावून धरला होता. सभासदांनी त्यांना साथ देत असताना जर प्रसंग आलाच तर कोट्यवधी रुपयांची ठेव जमा करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद सुध्दा दिला होता.डांगे व बिले यांनी स्वतःच्या खात्यातील प्रत्येकी एक कोटी रुपये ठेव आदिनाथ सुरु करण्यासाठी देण्याची घोषणा करताच सभासद सुध्दा स्वतः हुन समोर आले होते व त्यांच्या वतीने सुध्दा ठेवीच्या रुपात आदिनाथ सुरु करण्यासाठी आर्थिक उभारणीस हातभार लावण्यासाठी निर्णय झाला होता. शेलगाव सारख्या काही गावांनी सुध्दा डांगे-बिले-चिवटे यांच्या हाकेला ओ देत कोट्यवधी रुपये सभासदांमधून गोळा करण्यात येणार असल्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण काही केल्या भाडेपट्टी करार रद्द करण्यात यावा अशी अपेक्षा सभासद बाळगून होता. यामुळेच मग आता आदिनाथ बचाव समितीने महात्मा गांधींचे सत्याग्रहाचे शस्त्र हाती धरावे अशी मागणी सभासदांमधून जोर धरु लागली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आदिनाथ वाचवण्यासाठी व सभासदांकडून वाढत चालेला अपेक्षेसाठी डांगे-बिले-चिवटे हे कोणता निर्णय घेतात याकडे आता संपुर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts