loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष अध्यक्षपदी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची निवड

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आज झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपुरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर बोलताना बेल्हेकर म्हणाले की संघटेनच्या ध्येय धोरणानुसार सोलापूर जिल्ह्यात पुढील वाटचाल केली जाईल असे सांगीतले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या बैठकीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदाधिकारी व सदस्य यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.या नुसार सहध्यक्षपदी तहसीलदार अमोल कुंभार,उपाध्यक्षपदी नायब तहसीलदार रविकिरण कदम,सदस्य सचिवपदी नायब तहसीलदार प्रवीण घम तर सल्लागारपदी तहसीलदार स्वप्नील रावडे,तहसिलदार प्रशांत बेडसे यांची निवड करण्यात आली आहे.

चौफेर (पंढरपूर प्रतिनिधी)

यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार बेल्हेकर यांनी संघटेनच्या ध्येय धोरणानुसार सोलापूर जिल्ह्यात पुढील वाटचाल करू अशी ग्वाही दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts