loader
Breaking News
Breaking News
Foto

बागलांना विरोध करण्यासाठी आदीनाथचा बळी ? - युवासेनेचे सचिन काळे यांचा गंभीर आरोप!

आदीनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज फाईल , भाडेतत्व या विषयावर शासन दरबारी मदत होणार असली कीच वाद विवाद का घडतात?असा सवाल युवा सेना माजी तालुकाध्यक्ष सचिन काळे यांनी केला आहे. यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की नेते मंडळीनी आदिनाथ सहकार तत्वावर चालवा कींवा अन्य कोनत्याही तत्वावर पण कारखाना चालू होऊ द्यावा हि सर्वांची भावना असल्याचे देखील त्यांनी सांगीतले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आदिनाथ कारखाना म्हणजे स्वताच्या प्रसिद्धीचे साधन बनवले आहे . पवारांनी देखील बारामती ॲग्रोच्या माध्यमातून कारखाना चालवु असे म्हणुन दोन हंगाम वाया घालवले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांसमोर अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा राहिला व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले असुन आदिनाथ बाबतचे स्पष्ट धोरण पवार यांनी जाहीर करावे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळु नये असे आवाहन सचिन काळे यांनी आमदार रोहीत पवार यांना केले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

राष्ट्रवादी सोडून बागल कुटुंब शिवसेनेत गेले विधानसभा लढवली या मध्ये बागल यांचा पराभव देखील झाला मात्र बागलांनी शिवसेना सोडली याचा राग पवार कुटुंब आदिनाथ सारख्या शेतकऱ्यांचे मंदिर असलेल्या संस्थेवर काढणार असेल तर ते चुकिचे आहे असे देखील काळे यांनी म्हटले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कारखाना चांगला चालला तर बागल आमदार होतील या भीतीने तालुक्यातील बड्या बड्या नेत्यांनी कामगार पुढारी यांना हताशी धरून कारखाना स्थळावर आंदोलन करुन, संचालक फुटीच्या अफवा उटवुन मिडीया ट्रायल केला व कर्ज देणाऱ्या बॅंकेसमोर आदिनाथ चे चुकीचे चित्र निर्माण केले.संस्थेत वादविवाद असल्याचे दाखवून आदिनाथ ला कर्जच मिळु नये अशी व्यवस्था केली. बागलांना विरोध करण्यासाठी आदीनाथचा बळी दिला असा गंभीर आरोप काळे यांनी केला.असून रोहीत पवार देखील बागलांना विरोध करण्यासाठीच आदिनाथ चा वापर करत आहेत असे म्हटले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts