loader
Breaking News
Breaking News
Foto

भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन चुलत बहिणीस पळवुन केले लग्न? पोलीस गुन्हा, तपास लागेना.!

करमाळा तालुक्यात भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून मांगी ता करमाळा येथील वय (१६ वर्ष ७ महिने) अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असून या संदर्भात २३ फेब्रुवारी रोजी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

एक महिन्यापासून मुलगी बेपत्ता असून तिला भावकीतीलच मुलाने पळवळुन नेहुन लग्न केले असुन त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तरी देखील तपास लागत नसल्याने पिडीत मुलीच्या आईने १५ मार्च रोजी पोलीस निरीक्षक करमाळा ,पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे पुन्हा लेखी अर्ज केला आहे

✍ चौफेर प्रतिनीधी

यातील सविस्तर घटना अशी की पिडीत अल्पवयीन मुलगी हि अकरावी सायन्स ला शिकत असुन सकाळी सात ते अकरा काॅलेज झाल्यानंतर एका खासगी हाॅस्पिटल मध्ये काम करत होती. सायकांळी सहा वाजेपर्यंत घरी न आल्याने नातेवाईकानी चौकशी केली मात्र ति अढळुन आली नाही. तसेच शेजारील राहणारा भावकीतीलच युवक देखील बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर उशीरा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. माझी मुलगी अज्ञान असून तिचा संबंधित युवका बरोबर तिच्या इच्छेविरुद्ध बालविवाह लावला आहे.यासाठी मदत करणाऱ्या नातेवाईक यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा व माझ्या मुलीचे या भयंकर प्रसंगातून सुटका व्हावी असे पिडीतेच्या आईने तक्रार अर्जात म्हटले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

भावकीतील अल्पवयीन मुलीस पळवुन नेहुण बालविवाह करून संशयीत आरोपीने लग्नाचे फोटो व्हटसप स्टेट्स ठेवून व्हायरल केले आहेत. तरी देखील तपास लागत नसल्याने हि घटना असे गैरकृत्य करणाऱ्यांचे मनोबल वाढवणारी ठरत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts