loader
Breaking News
Breaking News
Foto

सभासदांचा 'एल्गार 'आदिनाथ कारखाना चालुच करणार शेलगाव वांगी मधून अडीच कोटी रुपयांची ठेवी देण्याची घोषणा!

आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी शेलगाव वांगी येथील शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने जमिनी दिल्या या कारखान्यात काम करणारे बहुतांश कामगार आमच्या गावातला आहे आमचा उसाचा प्रश्न आदिनाथ कारखाना सोडू शकतो त्यामुळे हा आदिनाथ कारखाना सहकार तत्वावर सुरू झाला पाहिजे असा एकमुखी ठराव शेलगाव वांगी येथे झालेल्या आजच्या बैठकीत करण्यात आला.यावेळी एकच निर्धार आदिनाथ चालूच करणार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

बचाव समितीचे निमंत्रक आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांच्या उपस्थितीत आज शेलगाव वांगी येथे सायंकाळी बैठक झाली यावेळी सरपंच अमर राव ठोंबरे उपसरपंच नवनाथ केकान आदिनाथ चे माजी संचालक संजय खाडे बप्पा साळुंके सूर्यकांत केकान राजू बेरे दराडे गुरुजी खाडे सर रामभाऊ दराडे सतीश बेरे प्रभाकर कोरे खताळ सर नागनाथ केकान मार्केट कमिटीचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव बंडगर प्राध्यापक संजय चौधरी स पंचक्रोशीतील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते .यावेळी आदिनाथ कारखाना सहकार तत्वावर चालू झाला पाहिजे यावर एक मताने चर्चा होऊन शेलगाव वांगी मधून अडीच कोटी रुपयांच्या ठेवी ठेवणारा सभासदांची यादी जाहीर करण्यात आली या सर्व ठेवीदारांचे हरिदास डांगे यांनी स्वागत केले

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत प्रत्येक सभासदाने पोटतिडकीने आपले विचार मांडून कसल्याही परिस्थितीत या कारखान्याचे खाजगीकरण होऊ द्यायचे नाही असे मत मांडले यावेळी बोलताना शेलगाव वांगी चे सरपंच अमरसिंग ठोंबरे म्हणाले की आदिनाथ कारखाना हा आमच्या शेलगाव वांगी गावाच्या कार्यक्षेत्रात आहे या कारखान्याचे सर्व संरक्षण हीत जोपासण्याचे प्रामुख्याने काम आमच्या गावकऱ्यांचे आहे आज हरिदास डांगे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा कारखाना पुन्हा जोमाने चालणार हा विश्वास आमच्या मनात निर्माण झालेला आहे.आता हा कारखाना चालू करण्यासाठी सर्व सभासद एकत्र येत असताना राजकीय मंडळींनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी या खोडा घालू नये असे आव्हानही सभासदांनी केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आदिनाथ सहकारी तत्त्वावर चालू होणार यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून अशाच पद्धतीने गावोगावी बैठका घेणार असल्याचे बचाव समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts