छत्रपती शिवाजी महाराजांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी मजूर सुखी राहायला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून रयतेचे राज्य निर्माण केले त्यादृष्टीने करमाळा तालुक्यातील शिवसेना कामकाज करीत असून सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाण्यासाठी करमाळा शिवसेना खंबीर असल्याचे मत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले.
आजच शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला करमाळा शिवसेनेच्यावतीने महेश चिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर गरजू लोकांना मोफत औषधोपचाराचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तिथीप्रमाणे साजरी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना आदिनाथ साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष हरिदास डांगे विद्या विकास मंडळाचे माजी प्राचार्य जयप्रकाश बिले सोलापूर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे माजी शहरप्रमुख संजय अप्पा शीलवंत उपशहर प्रमुख राजेंद्र काळे युवा सेनेचे शहरप्रमुख विशाल गायकवाड संभाजी ब्रिगेडचे निलेश चव्हाण खंडू चांदगुडे अमरनाथ चिवटे राजेंद्र मेरगळ युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख मयुर यादव युवा सेनेचे तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे संजय जगताप पत्रकार नागेश शेंडगे नासिर कबीर प्राध्यापक आशोक नरसाळे आदीजण उपस्थित होते .यावेळी बोलताना माजी शहरप्रमुख संजय शिलवंत म्हणाले की करमाळा शहरातील प्रत्येक वर्गात जाऊन सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या समस्या समजून घेऊन त्यांना मोफत औषध उपचार देण्याच्या कामकाजाची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. शिवसेना युवासेना महिला आघाडी हे सर्व जण मिळून एकत्रितपणे येत्या महिनाभरात हा उपक्रम संपूर्ण शहरात राबवणार आहे असे सांगीतले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.