loader
Breaking News
Breaking News
Foto

दम असेल तर ऑफलाईन सभा घेऊन निर्णय घ्या ! ३२ हजार सभासदांचा ३७५ सभासद निर्णय कसा काय घेऊन शकतात ? गलांडे यांचा सवाल.

आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देयचा की सहकार तत्त्वावर चालवायचा यासाठी सभासदांचे मत पुन्हा एकदा जाणुन घेण्यासाठी आज ऑनलाईन सभा पार पडली मात्र ज्यांना सभेची लिंक उपलब्ध झाली नाही त्या सभासदांकडून अत्ता संताप व्यक्त केला जात असून ३२ हजार सभासदांचा ३७५ सभासद निर्णय कसा काय घेऊन शकतात ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

बॅंकेने आदिनाथचा बारामती ॲग्रो बरोबर केलेला करार कायम राहणार, का आदिनाथ सहकार तत्त्वावर सुरु होण्याचा ठराव मंजूर होणार .हे अजून गुलदस्त्यात असताना ऑनलाईन बैठकीवरुन पुन्हा टिका सुरु झाली आहे.चिखलठाण येथील उस उत्पादक शेतकरी बबनराव गलांडे यांनी कारखाना प्रशासन व ऑनलाइन सभेस मान्यता देणाऱ्या बचाव समितीवर सडकून टिका केली असुन सभासदांचे खरे मत जाणून घेयचे असेल तर ऑफलाईन सभा घेऊन दाखावा असे खुले आव्हान दिले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

अधिक बोलताना त्यांनी म्हटले आहे की उसाच्या कोठारात असलेला व बैलगाडीतून उस पुरवठा होणारा राज्यातील एकमेव असा कारखाना असताना भ्रष्टाचाराने बरबटलेले सत्ताधारी व विरोधक व आजपर्यंत चे सर्वच सुपारीबाज आंदोलक या सर्वांनी मिळून आदिनाथ बंद पाडण्याचे पाप केले असुन आदिनाथ अडचणीत आणणारे कधीच सुखी होवु शकणार नाहीत. हे सारे सत्तेसाठी हपापलेले अतृप्त आत्मे आहेत. अशी बोचरी टीका देखील गलांडे यांनी केली आहे.तसेच राजकीय सोयीसाठी आदिनाथ चा वापर करताना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार कोणीच का केला नाही सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान कारखान्याच्या ऑनलाईन सभेचे इतिवृत्त समोर आल्यानंतर खरा निर्णय समोर येणार असून यानंतर अनेक संमिश्र प्रतिक्रीया उमटतील असे बोलले जात आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts