loader
Breaking News
Breaking News
Foto

जेऊर येथे केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन समीती प्रशिक्षण शिबीर संपन्न

गटविकास अधिकारी मनोज राऊत गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील ,केंद्रप्रमुख भारत पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व सर्व शिक्षकांसाठी दोन दिवसाचे केंद्रस्तरीय प्रशिक्षण जेऊर केंद्राचे जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा जेऊर येथे संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भारत प्रायमरी स्कूल,जेऊर प्रशालेचे मुख्याध्यापक-श्री दिपक व्यवहारे सर यांचे हस्ते करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मार्गदर्शन करताना व्यवस्थापन समितीची पुनर्घटन प्रक्रिया, मुख्याध्यापक यांची भूमिका तसेच व्यवस्थापन समितीचे कार्य व एफ. एल. एन. उपक्रम यावर श्री हनुमंत कळसाईत सर यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात आदलिंग वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री नितिन व्होटकर सर यांनी बालकांचा आहार ,शालेय विकासात शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी कसे घडवावेत ,अंगणवाडी शिक्षणाचे महत्त्व इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

केंद्रप्रमुख श्री भारत पांडव सर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश मुख्याध्यापक व शिक्षकांची कर्तव्ये ,शाळेतील विविध उपक्रम व प्रशासकीय बाबींचे सखोल मार्गदर्शन केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

तसेच मुख्याध्यापक दिपक व्यवहारे सर यांनी शिक्षक ,शालेय व्यवस्थापन समिती व पालक एकत्र येऊन काम केल्यास मराठी शाळांचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही . व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण तयार होतील यासाठी सर्व शाळांतील शालेय व्यवस्थापन समितीने सहकार्य करावे असे सांगितले. या प्रशिक्षणास केंद्रातील सर्व शाळांचे शिक्षक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य उपस्थित होते. श्री. सतिश कात्रेला सर यांनी आभार मानून प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts