आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देयचा की सहकार तत्त्वावर चालवायचा या वर सभासदांचे मत जाणून घेण्यासाठी आदिनाथ बचाव ने संचालक मंडळास पुन्हा एकदा वार्षिक सभा घेण्यास भाग पाडले होते.मात्र आज झालेल्या ऑनलाईन वार्षिक सभेकडे सभासदांनी पुन्हा एकदा पाठ फिरवली असल्याचे उघड झाले आहे. या बैठकीत 368 सभासद सहभागी असल्याचे समजत आहे.बहुतांश सभासद हे शेतकरी व मध्यमवर्गीय व अशिक्षित असल्याने झुम मिटींग मध्ये त्यांना सहभाग घेता आला नाही तसेच अनेक सभासदांना या बैठकीची लिंक उपलब्ध झाली नसल्याचे देखील समजत आहे.त्यामुळे या बैठकीत काय झाले हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.
कारखाना स्थळावर ऑफलाईन पदध्तीने हि सभा घ्यावी अशी सर्वांची मागणी होती बचाव समितीकडून देखील सुरवतातीला तशीच मागणी केली जात होती नंतर मात्र बचाव च्या भुमिकेत ऐनवेळेस बदल झाला व ऑनलाइन सभा घेऊन बचाव ने दिलेले विषय चर्चेस घ्यावे असे पत्र दिले गेले .दरम्यान बैठकीची तारीख जाहीर झाल्यापासून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या होत्या.यामध्ये काहींनी रोहीत पवार यांच्या बाजुने तर काहींनी संजयमामा यांच्या बाजुने विधान केले होते.तर काही सभासद कामगार हे "कसा होवो कोणी करो पण आदिनाथ सुरु झाला पाहिजे" या भुमिकेत होते. बचाव समितीवर देखील अक्षेप घेण्यात आले होते.या संपूर्ण घडामोडींमुळे वातावरण ढवळून निघाले होते .
आदिनाथ बचाव ला शेतकरी सभासदांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता बहुसंख्य सभासद सहभागी होतील असा अंदाज होता मात्र प्रत्यक्षात खुपच कमी लोक सहभागी झाल्याने बचाव च्या विश्वासार्हतेवर पाठिंब्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या ऑनलाईन सभेत काय निर्णय झाला यासाठी कारखान्याचे चेअरमन, बचाव च्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र ठोस माहिती मिळाली नसून भाडेतत्त्वाच्या विषयावर काय निर्णय झाला याची माहिती मिळवण्यासाठी कारखाना प्रशासनाकडून बैठकीचे इतिवृत प्रसिद्ध झाल्यानंतरच ठाम पणे बोलता येईल.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.