loader
Breaking News
Breaking News
Foto

सालसे येथे केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर संपन्न

गटविकास अधिकारी मनोज राऊत ,गटशिक्षण अधिकारी राजकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांसाठी सालसे ता करमाळा येथे दोन दिवसीय केंद्रस्तरीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे उदघाटन केंद्रप्रमुख श्रीरामे सर व हिवरे जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष शंभुराजे फरतडे यांच्या हस्ते करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात हिवरे शाळेचे सहशिक्षक जालिंदर हराळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्गठन प्रकिया, मुख्याध्यापक यांची भुमिका तसेच समितीचे कार्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात वरकुटे जिल्हापरिषद शाळेतील मुख्याध्यापक घाडगे सर यांनी बालकांचा आहार, अंगणवाडी शिक्षणाचे महत्त्व समाजावून सांगितले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

केंद्र प्रमुख श्रीरामे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश, मुख्याध्यापक यांची कर्तव्य व शाळेतील प्रशासकीय बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. सालसे येथील शिक्षणप्रेमी तानाजी लोकरे सर यांनी लोकसहभागातून सालसे शाळेचा कशा प्रकारे विकास केला ते सांगितले.समारोपाचे भाषण करताना हिवरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंभुराजे फरतडे यांनी शिक्षक, शाळा समिती व पालकांनी एकत्र येऊन काम केल्यास मराठी शाळांचा कायापालट होण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी सालसे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षिका व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यात अभिनव भारत सेवाभावी संस्थेचे सहकार्य लाभले. आभार कोळगाव जिल्हापरिषद शाळेचे झिंजाडे सर यांनी मानले तर सूत्रसंचलन सांगळे सर यांनी केले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts