विद्यार्थ्यांनी मनावरील दबाव झुगारून परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी विद्यार्थ्यांना केले.सालसे येथील यश क्लासेस च्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते. या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून चौफेर पत्रकार शंभुराजे फरतडे,सरपंच सतिश ओहळ , उद्योजक सतीश रुपनर ,प्रवीण कात्रेला ,शरद पवार ,जालिंदर शिंदे, लहु येवले उपस्थित होते .यावेळी अधिक बोलताना मनोज राऊत म्हणाले की बोर्डाची परिक्षा म्हटलं विद्यार्थ्यांच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण झालेली असते. त्यामुळे विद्यार्थांचा गोंधळ उडतो त्यामुळेच केलेले पाठांतर देखील विसरते अशा वेळी गोंधळून न जाता दहा मिनिट शांत राहवे व त्यांनतर प्रश्नपत्रिका सोडविण्यास घ्यावी पाठांतर केलेले अपोआप आठवण्यास सुरवात होईल असे ते म्हणाले त्याच बरोबर यशापयश याचा विचार न करता आयुष्याची लढाई लढत राहिल्यास यश नक्की मिळते त्यामुळे मनावरील दबाव झुगारून परिक्षेस सामोरे जा असा सल्ला देतानाच राऊत यांनी आपल्या आयुष्यातील अनेक खडतर प्रसंग विद्यार्थ्यांना सांगीतले.
यश क्लासेस तानाजी लोकरे सर यांच्या क्लासेस मध्ये मि देखील अभ्यासाचे धडे घेतले आहेत हे सांगताना लोकरे सर यांनी केलेले मार्गदर्शन दररोजच्या आयुष्यात देखील मार्गदर्शक ठरत असल्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगीतले.
यावेळी शिक्षक होण्याचे स्वप्न बघणार्या यश क्लासेस तानाजी लोकरे सर यांनी तिन मार्कांनी डिएड चा प्रवेश हुकल्यापासुन ते गेल्या विस वर्षापासूनचा क्लासेस चा प्रवास सर्वासमोर उलगडला. मनोज राऊत यांच्या प्रमाणे यश क्लासेस च्या बॅच मधील अन्य विद्यार्थी देखील अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर पोहचले आहेत याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगीतले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.