उद्या दिनांक 20 मार्च रोजी आदिनाथ कारखान्याची सर्वसाधारण सभा होणार असून हि सभा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. वास्तविक पाहता हि सभा ऑफलाईन पध्दतीने घ्यावी असे बहूतांश सभासदांचे म्हणणे होते. कोरोना महामारीची लाट संपुन गेल्यानंतर सर्व निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. यामुळेच मग हि सभा कारखाना कार्यस्थळावर प्रत्यक्ष सभासदांच्या उपस्थितीतीत होईल असा सर्व राजकीय जाणकार मंडळीचा अंदाज होता. पण आदिनाथ बचाव समितीचे अध्यक्ष हरिदास डांगे यांनीच संचालक मंडळास सभा ऑनलाईन व्हावी अशी मागणी केल्याने अत्ता सभासदांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत. हि मागणी रश्मी बागल व आमदार संजय शिंदे व बचाव समिती या तिघांमध्ये चर्चा होऊनच नंतर ठरली असल्याचे बोलले जात आहे. या ऑनलाईन सभेसाठी केवळ शिंदे व बागल यांना माननारे सभासदच सहभागी होतील अशी रणनीती आखली गेली असावी. एकुणच बागल व शिंदे व बचाव चे काही पदाधिकारी या दोघांनी पुणे येथे एकत्रीत बसुन पुढील रणनीती आखल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सदर दोन नेत्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली असून आगामी निवडणुकीत या दोन गटांची युती होणार असल्याचे देखील जवळपास निश्चित झाले आहे. आमदार रोहीत पवार यांच्या आदेशावरून सर्व नियोजन केले जात असून महाविकास आघाडीच्या नावाखाली बागल व शिंदे यांना परत एकदा एकाच झेंड्याखाली आणण्याचा हा पुन्हा प्रयोग होणार आहे.अशी चर्चा आत्ता जोरदार सुरु आहे.
या सर्व डावपेचासाठी आदिनाथ बचावच्या माध्यमातून राजकीय वातावरण तापवले गेले आहे का ?अशी देखील शंका आत्ता सभासदांकडून बोलून दाखवली जात आहे. यातही आमदार रोहीत पवार यांना विरोध करणारा घटक हा माजी आमदार नारायण पाटील गटातूनच निवडला गेला. माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते-पाटील यांचे नेतृत्व मानत असल्याने त्यांचा राजकीय गेम आदिनाथ बचावच्या माध्यमातून करण्यात पवार-शिंदे-बागल हे सध्या तरी यशस्वी झाले आहेत. आदिनाथ कारखान्याच्या मतदार सभासदांच्या यादीत जवळा सह 12 गावे समाविष्ट असुन हा भाग आता तेधील विद्यमान आमदार रोहीत पवार यांना माननारा आहे. यामुळेच मग आगामी निवडणुकांमध्ये विरोधक हा फक्त नावालाच उरणार असुन या महाआघाडी पॅनलचा पाच हजार मतांच्या फरकाने विजय होईल असा अंदाज आखला तर तो चुकीचा ठरणार नाही.
आमदार रोहीत पवारच आदिनाथ चालवणार असुन त्यांना सहकार्य करणारे संचालक मंडळ सुध्दा पवार कुटुंबास मानणारे असावे याची दक्षता आतापासूनच घेतली गेली आहे. एकंदरीत उद्याच्या सभेत शिंदे बागल यांचे समर्थक मतदार सभासद कारखाना भाडेपट्टी करारावर देण्यात यावा या बाजूने मतदान करतील. पण प्रत्यक्षात मात्र हा विरोध माजी आमदार नारायण पाटील यांच्या समर्थकांनी केला अशी चर्चा होणार आहे. हा सगळा खटाटोप कितपत यशस्वी होणार हे सांगायला आता केवळ 18 तास उरले असुन उद्या सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.