loader
Breaking News
Breaking News
Foto

पोस्टमास्तर परमेश्वर भोगल यांच्या प्रयत्नामुळे बोरगाव पोस्ट ऑफिस- महाराष्ट्र सर्कल मध्ये प्रथम

पंढरपूर विभागातील करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील पोस्टमास्तर श्री परमेश्वर मदन भोगल यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून केलेले काम हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे बोरगाव व त्यांच्या आसपासच्या गावात त्यांनी लॉक डाऊन च्या काळात सामान्य जनतेपर्यंत पोस्टल बँकेच्या विविध सेवा पोहोचवल्या आहेत यामध्ये पोस्टमास्तर श्री भोगल यांनी एकुण एक हजार महिलांची पोस्टल बँकेचे खाते उघडलेली असून शेतकरी वर्गाला प्रधानमंत्री किसान योजनेचे AEPS द्वारे 50 लाख रुपयांचे वाटप केलेले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तसेच पोस्ट ऑफिस मार्फत राबविल्या जात असलेल्या विविध योजनाही ते आपल्या गावात व करमाळा शहरात ही प्रभावीपणे राबवत आहेत त्यांचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे काम महाराष्ट्र सर्कल मध्ये प्रथम क्रमांकाचे असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व सत्कार होत आहेत यामध्ये पंढरपूर विभागाचे अधीक्षक एन रमेश ,सहाय्यक अधीक्षक श्री आर बी घायाळ सर, करमाळा उपविभागीय अधिकारी गाडे सर, करमाळ्याचे पोस्टमास्तर सौ पायगन मॅडम, धीरज पाटील संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुरव, राजाभाऊ रोंगे, गणेश माने तसेच संघटना प्रतिनिधी रमेश शेलार यांनी त्यांचे मनोमन कौतुक करुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

या वीस वर्षांच्या कालावधीत तळमळीने केलेल्या कामाचे हे फळ आहे सर्व अधिकारी वर्गासह मित्र परिवाराने माझ्या पाटीवर कौतुकाची थाप टाकली सर्वांनी अभिनंदन केले त्या बद्दल सर्वांचा आभारी अाहे - परमेश्वर भोगल (पोस्टमास्तर बोरगाव)

तालुका प्रतीनिधी

पोस्ट मास्तर परमेश्वर भोगल हे २२/०७/२००० रोजी पोस्ट खात्यात रुजु झाले आहेत या वीस वर्षाच्या कालावधीत डाक विभागात काम करताना अनेक चढ-उतार आले परंतु माझ्या जडणघडणीमध्ये व यशा मध्ये माझ्या कुटुंबा बरोबरच बोरगाव ग्रामस्थ, मित्रपरिवार पोस्टल मित्र परिवार यांचा मोठा वाटा असल्याचे ते सांगतात आज तागायत खात्यामध्ये प्रामाणिकपणे काम करताना नोकरी हे समाजसेवेचे माध्यम समजुन काम करत आलो त्या मुळे खूप मोठे समाधान वाटत असल्याचे असे श्री परमेश्वर भोगल यांनी सा करमाळा चौफेरशी बोलताना सांगितले. कोरोना व लॉकडाउनच्या परिस्थितीतही पंढरपूर विभागातील सहा तालुक्यात प्रथम येण्याचा मला मान मिळाला हे या वीस वर्षांच्या कालावधीत तळमळीने केलेल्या कामाचे फळ मिळाले असल्याचे ते सांगातात

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts