loader
Breaking News
Breaking News
Foto

विषय क्रमांक ९,१०,११ वर ऑनलाईन सभेत चर्चा करण्यास आदिनाथ बचाव ची मान्यता ! उद्याची ऑनलाईन सभा ठरवणार आदिनाथ चे भवितव्य.

ऑनलाईन पद्धतीने सभा घेऊन सभासदांचा विश्वासघात करत कोरोना निर्बंधाचा फायदा घेवून आदिनाथ च्या बारामती ॲग्रो बरोबर होणाऱ्या करारास मान्यता दिली असा संचालक मंडळावर आरोप केला जात होता. करार झाल्याचे देखील सांगीतले जात होते मात्र कारखाना सुरु होण्यास लागणारा विलंब, उस गाळपास शेतकऱ्यांकडून होणारी लुठ या मुळे शेतकऱ्यांकडून व सभासदांकडून संचालक मंडळ व बारामती ॲग्रो विरुद्ध संताप व्यक्त होत होता या तुन आदिनाथ बचाव चा जन्म झाला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकार तत्त्वावर चालावा यासाठी आदिनाथ बचाव समीतीची स्थापना झाल्यानंतर या समितीने कारखान्याची सर्वसाधारण सभा बोलावुन सभासदांचे मत पुन्हा एकदा जाणुन घ्यावे अशी मागणी आदिनाथ चे चेअरमन धनंजय डोंगरे व रश्मी बागल यांची भेट घेऊन केली होती. या भेटी दरम्यान काही मागण्यांचे निवेदन देखील सादर केले होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कोरोना निर्बंधामुळे हि सभा ऑनलाईन पदध्तीने घेण्यास परवानगी मिळाली होती त्यामुळे आदिनाथ बचाव समितीकडून रश्मी बागल यांना पुन्हा एकदा पत्र देऊन ठराव क्रमांक १ मधील विषय क्रमांक ९ नुसार दहाहजार रु शेअर्स ची दर्शनी किंमत पाच हजाराने वाढवुन पंधरा हजार करणे, विषय क्रमांक १० नुसार 31मार्च 2021 रोजी झालेल्या ऑनलाईन वार्षिक सभेत विषय क्रमांक ९ नुसार एम एस सी बॅंक मुंबई यांनी आदिनाथ कारखाना सरफेसी ॲक्ट नुसार ताब्यात घेऊन बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याच्या निर्णयाच्या बाजुने समंत झालेला ठराव रद्द करावा ,तसेच आदिनाथ भाडेतत्त्वावर न देता कर्जाचे पुनर्गठन राज्य सहकारी बँकेने करण्याबतचा विषय घेऊन झालेल्या निर्णयाच्या प्रती मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री, महाराष्ट्र सहकार मंत्री,साखर आयुक्त व राज्य बॅंकेला पाठवण्याचे निर्णय घेणे हे विषय ऑनलाईन सभेत घेणे सभासदांना मान्य नसुन हे विषय ऑनलाईन सभेत न घेता ऑफलाइन सभा घेऊन ठराव घ्यावेत आशी मागणी केली होती.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

त्यामुळे उद्या होणाऱ्या या ऑनलाईन सभेत या विषयावर चर्चा होणार का नाही विषयावर संभ्रम होता मात्र आज बचाव समितीकडून अध्यक्ष हरिदास डांगे यांनी रश्मी बागल यांना आज पुन्हा एकदा लेखी पत्र दिले असुन २० मार्च रोजी होणाऱ्या ऑनलाईन वार्षिक सर्व साधारण सभेत आदिनाथ बचाव समितीकडून दिलेले विषय चर्चेसाठी मांडावेत अशी भुमिका घेतली असल्याने उद्या एम एस सी बॅंकेने आदिनाथ चा बारमाती ॲग्रो बरोबर केलेला भाडे करार रद्द करावा असा ठराव सभासद करणार का? आदिनाथ भाडेतत्त्वावर न देता राज्य बॅंकेने कर्जाचे पुनर्गठन करावे या मागणीचे ठराव संमत होवुन कारखाना सहकार तत्वावर चालण्यासाठीच्या आदिनाथ बचाव च्या संघर्षाचा विजय होणार का? व पवारांच्या घशात गेलेला आदिनाथ बाहेर काढण्याची महत्वपूर्ण लढाई सभासद जिंकतात का ? या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts