एप पी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून कोर्टी ते आवाटी रसत्याचे काम सुरु असुन संपुर्ण रस्ता उखडून ठेवल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याची मुदत संपत आली आहे तसेच पावसाळा तोंडावर आहे.त्यामुळेच घाई गडबडीत काम उरकण्याचा ठेकेदाराकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. नुकतेच जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे-पाटील यांनी आंदोलन करुन कामात दिरंगाई केल्याने या कंपनीला पाच कोटींचा दंड करण्यास भाग पाडले आहे.मात्र हा दंड खरेच होणार का सगळे प्रशासन मिळुन मिलीभगत करुन नाममात्र कारवाई करणार हे सामान्य लोकांना कसे समजणार ?हा संशोधना विषय आहे.तसेच यावेळेस धुळीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक पाच किलोमीटर साठी एक टँकर असे साठ किलोमीटर साठी बारा टँकर लावण्याचे आश्वासन दिले होते मात्र पांडे ते सालसे पर्यंत एकच टँकर दिवसातुन एक ते दोन वेळेस पाणी मारत असल्याने नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक अजुनही सुरु आहे.
नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या या कंपनीकडून आत्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, बांधकाम विभागाचे गुणनियंत्रण विभाग तसेच महसुल विभागाच्या डोळ्यात धुळफेक सुरु आहे का? असा सवाल आत्ता उपस्थित होत आहे. कारण या कंपनीकडून पांडे फिसरे दरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे.परंतु नेहमी प्रमाणे जुने डांबरीकरण संपूर्ण पणे उकरून त्यावर पाणी मारुण मुरुम टाकला जात नाही.त्याचे रोलींग केले जात नाही.डायरेक्ट जुन्या रस्त्याच्या मातीमीश्रीत खडीचा थर दिला जात आहे.त्यामुळे पाणी मारणे ,मुरुमाचा एक थर ,त्यावरचे रोलींग व नंतरच्या खडीचा थर हे वगळून डायरेक्ट मिक्सर मधुन आणलेल्या खडीचा (एम डब्ल्यु )थर दिला जात आहे.त्यामुळे भविष्यात या रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित होत असून या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, गुणनियंत्रण कक्ष व लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करतात ?असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग चे अधिकारी फोन उचलत नाहीत.
सर्व सामान्य नागरिकांच्या टॅक्स मधुनच हि सर्व कामे पार पडतात मात्र सर्व सामान्य नागरिक जेव्हा या बाबत माहिती मागतात तेव्हा त्यांना कोठेच माहिती मिळत नाही.माळढोक क्षेत्रात देखील या कंपनीचे मोबाईल खडी क्रशर कसे उभारले जातात? या मधुन तसेच डांबर प्लॅन्ट मधुन होणाऱ्या धुळी मुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांपर्यंत नुकसान झाले.श्वसनाचे विकार झाले, प्रदुषण होत आहे.ओव्हर लोड वाहतूक मुळे सौंदे,शेलगाव, गुळसडी, साडे, अर्जुनगर या भागातील जिल्हापरिषद तसेच मुख्यमंत्री पंतप्रधान सडक योजनेतुन झालेले ग्रामीण मार्ग पुर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. याला जबाबदार कोण?
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.