loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभवराजे जगताप जिल्ह्यातून जनतेतून निवडून आलेले एकमेव नगराध्यक्ष असल्याचा पक्षाला अभिमान- प्रदेशाध्यक्ष राऊत

सोलापूर जिल्ह्यातून थेट जनतेतून निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे ते एकमेव नगराध्यक्ष आहेत याचा पक्षाला अभिमान आहे अशा शब्दात युवक काँग्रेस चे नूतन तालुकाध्यक्ष वैभराजे जगताप यांचे कौतुक युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले आहे.राज्यभरातून युवक काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष पदापासून ते तालुका पातळीवर पदांसाठी चुरशीने निवणुका पार पडल्या. काँग्रेस पक्ष संघर्षातून जात असताना देखील पक्षाचे काम करण्यासाठी युवकांचा प्रंचड प्रतिसाद हा पक्षासाठी महत्वाचा मानला जात आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पाळेममुळे रुजवणारे स्व नामदेवराव जगताप यांचे नातु व काँग्रेस चे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव वैभराजे जगताप यांनी देखील युवक काँग्रेस च्या करमाळा तालुकाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता या मध्ये ते प्रंचड मतांनी विजयी झाले आहेत. वैभव जगताप हे करमाळा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिले आहेत ते काँग्रेस च्या पंजा चिन्हावर विजयी झाले होते.नुकताच त्यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला असून आगामी निवडणुकीसाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरु आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष पदी कुणाल राऊत हे विजयी झाले आहेत कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पूत्र आहेत. त विद्यार्थी दशे पासुन त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली आहे. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एनएसयुआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

नुकतीच वैभराजे जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची भेट घेतली या दरम्यान दोघांनी एकमेकांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या वैभवराजे हे जनाधार असलेले आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व असून संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातून थेट जनतेतून निवडून आलेले पक्षाचे ते एकमेव नगराध्यक्ष आहेत याचा पक्षाला अभिमान आहे.त्यांच्या नेतृत्वातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षला घवघवीत यश मिळू शकते हा विश्वास पक्षनेतृत्वाला असल्याचे कुणाल राऊत यांनी आवर्जून सांगितले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts