loader
Breaking News
Breaking News
Foto

गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव - जबाबदारीचे ओझे वाढले- मनोज राऊत यांची प्रतिक्रिया

करमाळा तालुक्यातील घोटी सारख्या ग्रामीण भागातुन शिक्षण घेऊन मोठ्या जिद्दीने गटविकास अधिकारी झालेल्या मनोज राऊत यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचायत समिती मध्ये लोकांची गर्दी दिसून आली. एखाद्या राजकीय नेत्या प्रमाणे हार तुरे,शाल श्रीफळ देऊन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे पहावयास मिळाले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

काही महिन्यापुर्वी गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार राऊत यांनी घेतला आहे.पदभार घेताच प्रत्येक गावातील शाळा, ग्रामपंचायत आरोग्य केंद्र यांना भेटी देऊन ग्रामीण भागाचा आढावा घेतला .त्यानंतर शिक्षण क्षेत्रावर भर देऊन सायन्स वाॅल च्या माध्यमातून शिक्षक व लोकवर्गणीतून अनेक शाळांचे रुपडे बदलून टाकले. त्यांच्या या कार्याची खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेऊन कौतुक तर केलेच परंतु कोंढारचिंचोली शाळेस भेट देऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्याने प्रशासक म्हणून देखील गटविकास अधिकारी यांच्याकडे जबाबदारी आल्याने पंचायत समितीची सर्व धुरा आत्ता काही महिने त्यांच्या हाती असणार आहे. तालुक्यातील सुपुत्र असल्याने सर्व नेते मंडळीं ,राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी समन्वयक साधून पंचायत समितीच्या सर्व योजना सामान्य नागरिकां पर्यंत पारदर्शकपणे पोहचवण्याची जबाबदारी राऊत यांच्यावर असणार आहे.शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच ग्रामविकासास चालना देण्यासाठी आरोग्य विभाग, कृषी विभाग ,पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे या कार्यालयातील कामकाज व योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवाव्या लागणार आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आज वाढदिवसानिमित्त करमाळा चौफेर च्या प्रतिनिधींनी त्यांच्या सोबत संवाद साधला असता आजच्या सत्कार शुभेच्छा व लोकांच्या प्रेमामुळे भारावलो असून नागरींकाच्या अपेक्षास पात्र राहुण काम करण्यावर भर देणार असल्याचे सांगतीले. तसेच पुर्वी लातूर जिल्ह्यातील देवणी येथील कामाचे अनुभव सांगताना आज सकाळ पासून देवणी येथील सामान्य नागरिकांपासुन राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बांधवांनी देखील अवर्जुन फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत हिच आपल्या कामाची पोहचपावती असून सत्कार व पुरस्कार हे जबाबदारीचे जाणीव करून देण्यासाठीच असतात असे सांगीतले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts