loader
Breaking News
Breaking News
Foto

वीजबिल दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी ! उद्या करमाळा व जेऊर येथे तक्रार निवारण मेळावा

वीजबिल दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून उद्या दिनांक १६ मार्च रोजी जेऊर व करमाळा येथे तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

वीजबिल वसुली सुरु झाली की शेतकऱ्यांना वीजबिलातील चुका दिसतात मात्र वीजबिल दुरुस्ती तसेच एकरकमी परतफेड, तात्काळ कनेक्शन यासारख्या विविध योजना महावितरण राबवत असते मात्र राजकीय फडाच्या चर्चेत दंग असलेल्या शेतकऱ्यांना या बातम्यां वाचण्यास व योजनेचा लाभ घेण्यास वेळ नसतो.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सध्या वीजबिल वसुली सुरु होती .अनेकांना वीजबिल हातात अल्यानंतर आपल्याकडे पाच एचपी ची मोटार असताना दहा एच पी चे बील असल्याचे समजले तर काहीजण कोटेशन तोडलले आहे .तरी बील कसे असे सवाल उपस्थित करत आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

ज्यांच्या बीलाचा, एचपीचा, कोटेशन च्या तारखेचा तसेच वीजबिल संदर्भात ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी असून घरगुती, औद्योगिक तसेच कृषी वीज बिल बाबत तक्रार असेल तर लेखी तक्रार अर्ज व वीजबिल प्रत घेऊन उद्या दिनांक 16 मार्च रोजी जेऊर ता करमाळा व करमाळा शहरातील महावितरण च्या कार्यलयात उपस्थित राहावे असे आवाहन बार्शी विभाग चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. तसेच माढा,बार्शी ,कुर्डुवाडी टेंभुर्णी येथील महावितरण कार्यालयात देखील उद्या तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts