loader
Breaking News
Breaking News
Foto

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची बाजु भक्कमपणे मांडल्यानेच शासन नमले! -भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे

ब्रह्मदेव आला तरी वीजबिल भरल्याशिवाय कनेक्शन जोडणार नाही अशी मस्तवाल भाषा वापरणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्याला व शासनाला देवेंद्र फडणवीस यांच्या अक्रमक पावित्र्या पुढे अखेर झुकावे लागले असून शेतकऱ्यांना वीजबिल वसुलीसाठी मिळालेली सवलत हि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मिळाली आहे असे मत भाजापा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी व्यक्त केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळेस अधिक बोलताना गणेश चिवटे म्हणाले की कोरोनातुन सावरत असलेला शेतकरी अतिरिक्त उसाचा प्रश्न, रब्बीच्या सुगीसाठी मजुरांची कमतरता या मुळे मेटाकुटीस आला होता.मात्र महाविकास सरकारकडून वारंवार वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करून पठाणी वसुली करण्यात येत होती.फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली केली नाही.महाविकास आघाडी सरकार मात्र शेतकऱ्यांच्या सध्य परस्थीतीचा विचार न करता शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करून मग्रूरीची भाषा वापर होते.पंढरपूर येथील युवक शेतकऱ्यांने वीजबिल वसुलीच्या तगाद्या मुळे आत्महत्या करुन देखील सरकाराला पाझर फुटला नव्हता .

✍ चौफेर प्रतिनीधी

अधिवेशना दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या वीजबिल प्रश्नावर अक्रमक पणे आवाज उठवला व वीजतोड तात्काळ थांबवावी अशी मागणी करुन शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध होईल पर्यंत दिलासा देण्याची मागणी केली होती.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अक्रमक भुमीके पुढे सरकार झुकले असून सरकार ने आम्ही शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे म्हणणे म्हणजे हास्यास्पद असून शेतकऱ्यांनी या सरकारला पुरते ओळखले असून आगामी निवडणुकीत शेतकरी सगळा हिशेब चुकता करतील असे देखील चिवटे यांनी स्पष्ट केले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts