loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा काँग्रेस च्या मागणीला यश ! खंडित वीज कनेक्शन तातडीने जोडण्याचे आदेश

शेतकऱ्यांचे खंडित वीज कनेक्शन तात्काळ जोडावेत व हप्ते पाडून उस बील येईपर्यंत शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यास मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी करमाळा काँग्रेस चे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महावितरण कडे केली होती.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या मागणीस यश आले असून आज उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तिन महिने मुदत वाढ दिली असून तोडलेले कनेक्शन जोडावेत असा आदेश दिला आहे.

✍ चौफेर प्रतिनीधी

थकीत वीजबिल वसुलीसाठी राज्यभर महावितरण कडून धडक मोहीम सुरु होती .या अनुषंगानेच करमाळा तालुक्यातील बॅकवॉटर भागातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले होते.तर जिरायत भागातील शेतकऱ्यांकडून देखील वसुली साठी तगादा लावला होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

महावितरण कडून सुरु असलेल्या या मोहिमेमुळे शेतकरी अडचणीत सापडला होता .कारखान्याची बीलं अजून जमा झालेली नाहीत. रब्बीचे पिके अजून शेतातच आहेत. मजुरांसाठी व उसतोडणी साठी पैसै जुळवाजुळव करणे शेतकऱ्यांला मुश्किल असताना हे वीजबिल वसुलीचा तगादा लावला होता मात्र महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिल्याने काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी महाविकास आघाडी सरकार व उर्जा मंत्री नितीन राऊत यांचे आभार मानले आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts