शेतकऱ्यांचे तोडलले वीज कनेक्शन तात्काळ जोडा अशी अग्रही मागणी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी केली आहे. या बाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात फरतडे यांनी म्हटले आहे की सध्या शेतकऱ्यांचे उस गाळपास पाठवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत. अतिरिक्त उस असल्याने एकरी दहा ते पंधरा हजार मोजून उस कारखान्याला घालवावा लागत आहे.अजून एकाही कारखान्याकडुन पहिली उचल मिळालेली नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीज बील वसुली साठी महावितरण ने कनेक्शन कट केले होते.त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता .मात्र महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत तिन महिने बिल भरण्यास मुदत दिली असून तात्काळ कनेक्शन जोडण्याचे आदेश आहेत.
विधीमंडळात सुरु असलेल्या अधिवेशनात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वीज जोडणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत आगामी तीन महिने कृषी वीज ग्राहकांची वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचे आदेश उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.
करमाळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांकडून वसुली साठी महावितरणने शेतकऱ्यांची रोहित्र सोडवुन ठेवली आहेत. सध्या उसतोड सुरु असलेल्याने अनेक टोळ्या तालुक्यात आहेत. वाड्यावस्त्यावर उतरलेल्या या टोळ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे तसेच तोडलेल्या उसाचा फुटवा होण्यासाठी लगेच पाणी देणे गरजेचे असते त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलेल्या आदेशानुसार तात्काळ तोडलेले कनेक्शन जोडावेत . शेतकऱ्यांमध्ये अगोदरच नाराजी असताना महाविकास आघाडी सरकारच्या या शेतकरी हिताच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात कुचराई केली तर शिवसेनेच्या वतिते कर्तव्य चुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात बाबत मुख्यमंत्री उर्जा मंत्री यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा शाहुराव फरतडे यांनी दिला आहे.निवेदनाच्या प्रती करमाळा व जेऊर येथील महावितरण च्या अधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.