loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकऱ्यांनो सावधान! पाॅटेश खत खरेदी करताना होत आहे फसवणूक

रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडत आहे सर्वात जास्त किमतीत वाढ झाली असेल तर म्युरेट ऑफ पाॅटेश या खतामध्ये. तीन महिन्यापूर्वी एक हजार रुपयाला मिळणाऱ्या या खताच्या 50 किलोची पोत्याची किंमत तब्बल एक हजार आठशे रुपये झाली आहे आठशे रुपये पोत्याचा किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना पाॅटेश खत वापरणे मुश्किल झाले आहे याचाच फायदा घेत काही कंपन्यांनी गोळी पाॅटेश या नावाने बनावट खत बाजारात विकण्याचा झपाटा लावला आहे संपूर्ण महाराष्ट्रात गोळी पाॅटेश या नावाने शेकडो कंपन्या दर महिना 50 हजार मेट्रिक टन हे बनावट खत विकत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे या बनावट गोळी पाॅटेश खताच्या पोत्याची खरेदी किंमत तीनशे रुपये प्रति बॅग असून गोणी शेतकऱ्यावर तब्बल 800 रुपयाला विकली जात आहे. बाजारात कोणतेही पाॅटेश नाही यामुळे या गोळी पाॅटेश चे महत्व पटवून शेतकऱ्यांच्या गळ्यात हे खत मारले जात आहे .एक गोळी पाॅटेश खताचा विक्री मागे तब्बल पाचशे रुपये फायदा होत असल्यामुळे बहुतांश रासायनिक खत विक्रेते याचा छुप्या मार्गाने विक्री करत आहे या खताची केंद्राच्या रासायनिक खत विक्री यादीत नोंद नाही यावर कोणाचाही कसला कंट्रोल नाही युरिया 10 26 26 15 15 15 सम्राट अशा दर्जेदार खत विक्री करत असताना विक्रेते त जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या गळ्यात त्यात दोन ते तीन पिशव्या खत देत आहेत केंद्र शासनाने रासायनिक खत विक्रीसाठी देण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशीनवर या खताची नोंद नसल्यामुळे खत आले किती गेले किती याचा मेळ लागत नाही .गोळी पोटॅश प्राधान्याने मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात विदर्भातील काही कारखाने यामध्ये तयार करून पाहिजेत या नावाने पिशवीत भरून महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी दिले जाते या गोळी पोटॅश चे नमुने काही शेतकऱ्यांनी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता त्यामध्ये केवळ फरशी पॉलिश केल्यानंतर कारखान्यातील उरलेली राख असल्याचे निष्पन्न झाले आहे ऊस केळी कांदा सर्वच पिकांसाठी पोटॅश खताची आवश्यकता असते पोटॅश हे खत भारतात तयार होत नाही हे खत संपूर्ण बाहेर देशातून आयात करावे लागते गेली सहा महिन्यापासून कोणत्याही कंपनीचे पोटॅश खत बाहेर देशातून आयात झालेले नाही. या खताच्या प्रचंड टंचाई चा फायदा घेतच आज ग्रामीण भागातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रातून गोळी पोटॅशच्या विक्री करून शेतकऱ्याची प्रचंड फसवणूक केली जात आहे .शिवाय या खतामुळे कोणतीही उत्पन्नात वाढ होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा तिहेरी नुकसान होत आहे खर्च वाया जातो उत्पन्नात वाढ वाढ होत नाही मजुरी वाया जाते. पर्यायाने या सर्व प्रकारामुळे देशाचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या विषयी बोलताना कांदा उत्पादक शेतकरी सुजित बागल म्हणाले की नेमके गोळी पाॅटेश खत काय आहे याचा खुलासा सुद्धा आता संबंधित कंपन्यांनी करणे गरजेचे असून यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

गेली सहा महिने पासून बाजारामध्ये पाॅटेश उपलब्ध नाही कृषी सेवा केंद्रात गेलो असता गोळी पाॅटेश घेण्याची बळजबरी केली जाते. हे गोळी पाॅटेश खत मी पाण्यात टाकून बघितले पूर्णपणे ती राख असल्याचे निष्पन्न झाले आहे सध्या बाजारात म्युरेट ऑफ पाॅटेश खतांची टंचाई आहे गोळी पाॅटेश या नावाचे खत नसून असे खत कोणी विकत असेल तर त्यांनी त्या विक्रेत्यांची नावे तालुका कृषी खात्याकडे द्यावेत आम्ही कायदेशीर कारवाई करू असे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी सांगितले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

देशात सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात पाॅटेश आयात करणारी करणारी इंडियन पाॅटेश लिमिटेड कंपनी आहे सध्या पाॅटेश शॉर्टेज आहे ओरिजनल पाॅटेश पांढरेशुभ्र बारीक मिठासारखे असते ते पाण्यात टाकल्यानंतर पूर्णपणे विरघळते कोणत्या पाॅटेश बद्दल शंका वाटल्यास त्यांनी आमच्या कंपनीशी संपर्क साधावा असे कंपनीकडून सांगण्यात आले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts