शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाचे दर३०रु - रुपये व दूध भुकटीस ५० रु अनुदान रुपये द्यावे यासाठी भाजपा जिल्हाध्यक्षांनी थेट गाईच्या गोठ्यात बसूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले ,आहे. ते पत्र पोस्टाद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचा शुभारंभ भाजपा करमाळा तालुक्याच्या वतीने करण्यात आला.करमाळ्यातील दूध उत्पादक शेतकरी लहू गाडे रा,विट यांच्या गाईच्या गोठ्यात जाऊन जिल्हाध्यक्ष मा, श्रीकांत देशमुख व भाजपा तालुकाध्यक्ष मा, गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी जिल्हाध्यक्षांना सोबत घेवुन करमाळा तालुक्यातील पंचविस शेकऱ्यांच्या गायी गोठ्यात जाऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासमोर मांडली,
भाजपाच्या वतिने दुध दर वाढी साठी आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु केला असुन हे आंदोलन तीव्र करून आघाडी सरकारला जाग येण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पोस्टकार्ड ,फेसबुक ,ईमेल ,व्हाट्सअप द्वारे दुध दरवाढ मागणी व दूध भुकटी अनुदान मागणीचे निवेदन पाठवण्यात येणार आहे. करमाळा तालुक्यातुन भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वा खाली पंधरा हजार दुध उत्पादक शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती भाजपा कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी तालुका सरचिटणीस सुहास घोलप ,महादेव फंड ,शशिकांत पवार, जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल ,महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव ,तालुका उपाध्यक्ष रामा ठाणे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, विस्तारक भगवान गिरी ,अशोक ढेरे ,किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विजय नागवडे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे , मोहन शिंदे ,काकासाहेब सरडे ,आजिनाथ सुरवसे ,दीपक चव्हाण ,युवराज किरवे, जयंत काळे पाटील ,संदीप काळे ,दीपक सवालके आदिजन उपस्थित होते ,
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.