करमाळा तालुक्यातील घोटी ,जेऊर, मांजरगाव, शेटफळ गुळसडी, सौंदे हिवरे गावातील एकुण नऊ बोगस डाॅक्टरांवर काल धाडी टाकण्यात आल्या .या डाॅक्टरांना काहीकाळ सभापती भवन व त्यानंतर दिवसभर पंचायत समिती कार्यालयात बसवून ठेवण्यात आले व संध्याकाळी सहा वाजता सोडण्यात आल्याची खात्रीशीर माहिती चौफेर च्या हाती लागली असून प्रत्येक डाॅक्टरांकडुन प्रत्येकी पन्नास ते साठ हजार रु घेऊन हे प्रकरण दाबण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या आठवड्या पासुन अशा प्रकारच्या धाडी टाकण्याचे काम सुरु असुन यातुन मोठे आर्थिक रॅकेट झाल्याची शक्यता आहे.तसेच या दरम्यान डाॅक्टरांवर दडपशाही करण्यात आल्याचे देखील समजले असुन पथकातील अधिकाऱ्यांना अशा प्रकारची दडपशाही करण्याचा अधिकार आहे का?हा मोठा प्रश्न आहे.सूत्रांकडून खात्रीशीर समजलेल्या माहीतीनुसार एका गावातील बोगस डाॅक्टरला क्विड गाडीतुन उचलले त्या वेळी एक लेडीज स्वतः ड्रायव्हिंग करत होती .गावातील काही युवकांनी विचारणा केली असता त्या महिला ड्रायव्हर ने गटविकास अधिकारी यांचे पत्र दाखवून शासकीय कामात अडथळा आणल्याची केस टाकण्याची धमकी देखील दिली आहे.विशेष म्हणजे शनिवार सुट्टीचा दिवस असताना हि कारवाई झालीआहे.याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता अशी कोणतीच लेडीज पथकात नसल्याचे समजून आले.तसेच गटविकास अधिकारी म्हणाले की आठ दिवसा पुर्वी कारवाईचे पत्र काढले आहे मात्र काल झालेली कारवाई बाबत माहिती नसल्याचे सांगितले.
करमाळा तालुक्यातील शेकडो बोगस डाॅक्टर असून या डाॅक्टर कडे लोक भंगेदर, मूळव्याध गजकर्ण, सांधेदुखी या अजारावर उपचार घेण्यास गर्दी करतात मध्यंतरी कोरोणा काळात देखील अनेक बोगस डाॅक्टरांनी कोरोनावर ईलाज केल्याचे देखील उघड झाले आहे.बोगस डाॅक्टरांवर कारवाई स्वागतार्ह असली तरी गावोगावी सरकारी दवाखान्यांची झालेली वाताहत यास कारणीभूत आहे हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.अनेक उपकेंद्र हे जनावरांचा गोठा बनली आहेत, आरोग्य सेवीका, डाॅक्टर राहत नसल्याचे सर्दी पडसे, खोकल्याच्या गोळ्या देखील नागरींकाना मिळत नाहीत. त्यामुळेच खर्च करून करमाळ्यातील हाॅस्पिटल मध्ये उपचार घेणे परवडत नसल्याने गोरगरीब नागरिक अशा डाॅक्टरांना जवळ करतात. आरोग्य विभाग पंचायत समीती बोगस डाॅक्टरांवर कारवाई करत असताना आपल्या विभागाच्या आरोग्य यंत्रणेच्या उडालेल्या बोजवाऱ्याकडे मात्र जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतात हे एक प्रकारचे गौडबंगाल आहे. त्यामुळेच मध्यंतरी आरोग्य सेवीका आशा सेवीका यांच्याकडून देखील लाखो रुपये उकळल्याची चर्चा पंचायत समीती व आरोग्य विभागाच्या परिसरात दबक्या आवाजात सुरु होती. मात्र काल झालेल्या कारवाईत कारवाई चे नियम कायदे धाब्यावर बसवुन भाईगीरी स्टाईल खंडणी सारखी वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेल्याने दबलेलेला हा आवाज जनते समोर मांडत आहोत.
काल झालेल्या या कारवाई मुळे अनेक नावे या रॅकेट मध्ये उघडकीस येण्याची शक्यता असून निःपक्ष पणे याची चौकशी व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे.गटविकास अधिकारी या पथकाचे अध्यक्ष असतात मग त्यांना आंधारात ठेवून कोणत्या पथकाने कारवाई केली? पथकात कोण सामील होते? पंचायत समिती कार्यालयात कोणत्या अधिकारात बसवून ठेवण्यात आले? जर ते बोगस डाॅक्टर होते तर मग कारवाई का झाली नाही ? ति महिला ड्रायव्हर कोण? पथकात कोणते अधिकारी किती वाहने सामील होती ? का संपूर्ण पथकच बोगस होते या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत याची उत्तरे जनतेला मिळणे अपेक्षित आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.