loader
Breaking News
Breaking News
Foto

डांगे यांच्या विधानावर बाजार समिती चे माजी संचालक शहाजी राऊत यांचा आक्षेप! राजकारणाचा स्पर्श नसलले समितीत नाहीत का ? राऊत यांचा सवाल.

राजकारणाचे जोडे बाजूला ठेऊन आदिनाथ बचाव समिती काम करणार या डांगे यांच्या विधानावर आक्षेप घेत आजमितीस राजकारणाचा स्पर्शही नसणारे कितीजण बचाव समितीमध्ये आहेत असा सवाल बाजार समितीचे माजी संचालक शहाजी राऊत यांनी माजी कार्यकारी संचालक डांगे यांना केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आदिनाथ बचाव समितीची उद्या कारखाना कार्यस्थळावर बैठक होणार असल्याची माहिती हरीदास डांगे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली व त्याच बरोबर ते एक शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून आले असे सांगण्यात आले.यावर आज बाजार समिती माजी संचालक शहाजी राउत यांनी आक्षेप घेतला. याबाबत सविस्तर बोलताना राऊत म्हणाले की डांगे यांचा अलिकडच्या काळातील सहवास हा शिंदे बंधू समवेत जास्त काळ असा असून एका विशीष्ट हेतूने डांगे हे आदिनाथ बचाव समिती मध्ये दाखल झाले असल्याचे सभासद दबक्या आवाजात बोलत आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आदिनाथ वाचवायचा असेल तर कोणा नेत्याचे उंबरे झिजवण्या ऐवजी उच्च न्यायालयाच्या दारात जाणे यास प्राथमिकता देणे गरजेचे आहे असे बहुतांश सभासदांना वाटते. मी सुध्दा आदिनाथ कारखान्याचा एक सभासद असुन कारखान्या विषयी भुमिका मांडण्याचा मला अधिकार आहे असे राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.अधिक बोलताना राऊत म्हणाले की आदिनाथ बचाव समितीचे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडणारे डांगे यांनी शिंदे बंधूंच्या साखर कारखान्यात नोकरी केलेली आहे. आजही म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन लि या कारखान्याने करमाळा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करुन व कागदपत्रे वापरुन विविध बँकांकडून पिक कर्ज घेतले असल्याच्या घटना लोकचर्चेत आहेत. करोडो रुपयांची ही रक्कम पिक कर्ज म्हणून या कारखान्याने जमा केली आहे. सदर कर्ज थकल्याने आता कारखान्या ऐवजी थेट शेतकऱ्यांना बँकेकडून नोटीसा दिल्या जात आहेत.अशी पिक कर्जे कारखान्यांना घेता येतात का यावर कोणीतरी सहकार क्षेत्रातील अनूभवी व्यक्तीने ठोस भुमिका मांडणे गरजेचे आहे. सहकारी साखर कारखाने उभारण्याचा आणि ते कारखाने भ्रष्टाचार मुक्त चालवण्याचा दांडगा अनुभव डांगे यांना आहे अशी चर्चा शेतकरी करत आहेत. यामुळे मग आदिनाथ वाचवत असताना या तालुक्यातील आदिनाथचा खरा मालक जर विठ्ठल कार्पोरेशन लि मुळे संकटात येत असेल तर याबाबत उपाययोजना करण्यासाठी डांगे यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून थोडा वेळ द्यावा.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आमदार शिंदे बंधूचे कारखाने यशस्वीपणे चालवण्याचा अनुभव पाठिशी असल्याने डांगे यांचे मार्गदर्शन या विषयावर महत्त्वाचे ठरणार आहे.आदिनाथ वाचवण्यासाठी निधी गोळा करण्याऐवजी अगोदर आदिनाथच्या या पिडीत शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी आता डांगे यांनी पुढाकार घ्यावा असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.तसेच विठ्ठल कार्पोरेशन विरुद्ध करमाळा तालुक्यातील शेतकरी अशी लढाई आता होणार असून शेतकऱ्यांचे नेतृत्व डांगे साहेब यांनी करावे, अशी हाक आता बाजार समिती माजी संचालक शहाजी राऊत यांनी कार्यकारी संचालक हरीदास डांगे यांना दिली आहे. आदिनाथ बचाव समितीची धुरा यशस्वीपणे सांभाळत असताना आता डांगे साहेब आपल्यालाही न्याय मिळवून देतील अशी आशा खोटे कर्जप्रकरण पिडीत शेतकरी बाळगू लागले आहेत.असे देखील राऊत यांनी म्हटले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts